अमरावतीत अघोरी परंपरा, लहान-मोठे सगळेच घालतात काट्यावर लोटांगण कारण...

अमरावतीत अघोरी परंपरा, लहान-मोठे सगळेच घालतात काट्यावर लोटांगण कारण...

अमरावतीच्या वडनेरमध्ये 400 वर्षांपासून काट्यावर लोटांगण घालण्याची अघोरी परंपरा सुरू आहे.

  • Share this:

28 मार्च : अमरावतीच्या वडनेरमध्ये 400 वर्षांपासून काट्यावर लोटांगण घालण्याची अघोरी परंपरा सुरू आहे. यामुळे आयुर्वेदिक उपचार होतात असा अत्यंत चुकीचा समज गावकऱ्यांमध्ये आणि यात्रेकरूंमध्ये आहे. या भयानक प्रकारात मोठी माणसंच नाही तर 5-5 वर्षांची लहान मुलंही सहभागी होतात, किंबहुना त्यांना भाग पाडलं जातं. संत झगेश्वर महाराजांची ही यात्रा आहे, त्यात हा प्रकार सुरू आहे.

एकीकडे महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायचं, आणि दुसरीकडे हे असले प्रकार सरकारच खपवून घेणार असेल, तर या अंधश्रद्धेला सरकारचा सुप्त पाठिंबा आहे, असा प्रश्न निर्माण होतो.

एकीकडे देश वैज्ञानिक धोरण स्विकारण्यावर भर असतांना दुसरी कडे या गावात प्रथा,परंपरा आजतागायत कायम ठेवत या गावातील लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यत रिंगणीच्या काट्यावर लोटांगण घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. वडनेर गंगाई येथे संत झगेश्वर महाराज यांच्या यात्रेला सध्या प्रारंभ झाला आहे. त्यामुळे या यात्रेत महाराजांच्या मंदिरात रिंगणीच्या कटयांवर लोटांगण घालण्याचा हा प्रकार अंधश्रद्धेचा असून काटे पाण्यात भिजल्याने व वजन समप्रमाणात विभागल्या गेल्याने इजा होत नसल्याचे अंनिस चे राज्य संघटक यांनी सांगितले.

 

First published: March 28, 2018, 9:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading