Home /News /maharashtra /

लग्नातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा; 300 जण रुग्णालयात दाखल

लग्नातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा; 300 जण रुग्णालयात दाखल

सायंकाळच्या वेळेस वऱ्हाडी मंडळींना अचानक उलट्याचा त्रास जाणवू लागला. अनेक जणांची प्रकृती ढासाळली

सायंकाळच्या वेळेस वऱ्हाडी मंडळींना अचानक उलट्याचा त्रास जाणवू लागला. अनेक जणांची प्रकृती ढासाळली

सायंकाळच्या वेळेस वऱ्हाडी मंडळींना अचानक उलट्याचा त्रास जाणवू लागला. अनेक जणांची प्रकृती ढासाळली

    लातूर, 23 मे  : लातूर (latur) जिल्ह्यामध्ये लग्नाच्या जेवणाऱ्यातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच वेळी 300 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. सर्व वऱ्हाडी मंडळींना तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यतल्या निलंगा तालुक्यातील केदारवाडी गावात एक विवाह सोहळा पार पडला. यावेळी जेवणातून अडीचशे ते तीनशे वऱ्हाडी लोकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे.  रविवारी केदारवाडी गावात हा विवाह सोहळा पार पडला होता. या लग्नाला वधू आणि वर मंडळीकडून गर्दी केली होती. लग्न सोहळा पार पडल्यानंतर वऱ्हाडी मंडळी आपआपल्या घरी गेली. त्यानंतर सायंकाळच्या वेळेस वऱ्हाडी मंडळींना अचानक उलट्याचा त्रास जाणवू लागला. अनेक जणांची प्रकृती ढासाळली. त्यामुळे तातडीने सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.  या घटनेनंतर निलंगा,अंबुलगा बु. जवळगा, वलांडी येथे शासकीय रूग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. (राज्य सरकारला 7 दिवसांचा अल्टिमेटम, 1 जूनपासून शेतकऱ्यांचे आंदोलन) सायंकाळच्या वेळेस वऱ्हाडी मंडळींना अचानक उलट्याचा त्रास जाणवू लागला. अनेक जणांची प्रकृती ढासाळली. विवाह सोहळ्यातील जेवनातून 300 वऱ्हाडी लोकांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर निलंगा उपजिल्हा रूग्णालय, अंबुलगा बु देवणी तालुक्यातील वलांडी जवळगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. यातील बरेच जण उपचारानंतर घरी गेले असून काही जणांवर अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. जमावाच्या मारहाणीत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू दरम्यान, दुचाकीचा धक्का लागल्याच्या गैरसमजूतीने दोन्ही मुलांसह महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. प्रमिला दिलीप सोनवणे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. दापोरा गावात लग्न होते . बाहेरगावाहून चारचाकी वाहनातून दोन जण लग्नाच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी प्रमिलाबाई सोनवणे यांचा मुलगा विजय हा ओट्यावर बसलेला होता. त्याच वेळी घरासमोरून कार जात असतांना एकाने दुचाकीचा कारला कट मारला आणि पसार झाला. कारचालकाने पुढे कार नेवून थांबविली व ओट्यावर बसलेल्या विजयनेच कट मारल्याचा गैरसमज करून त्याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली व लग्नाच्या ठिकाणी निघून गेला. (दादरसारख्या गजबजलेल्या एरियात भिंतीजवळ काय करत आहेत भरत अंकुश केदार?) दरम्यान, अज्ञात कारचालक हा कार घेवून लग्नाच्या ठिकाणी जावून पुन्हा १० ते १५ जणांना घेवून येत विजय सोनवणे याला मारहाण करण्यास सुरूवात केली. विजयला मारहाण होत असल्याचे समजताच विजयची आई प्रमिलाबाई , भाऊ अरूण आणि विजयची पत्नी प्रियंका हे आवराआवर करण्यासाठी आले. यात जमावाकडून चौघांना मारहाण करण्यात आली. यात प्रमिलाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . दरम्यान , महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या जमावाला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या