बीडमध्ये जेवणातून 10 मुलांना विषबाधा.. बालगृहातील आहारावर प्रश्न चिन्ह

बीडमध्ये जेवणातून 10 मुलांना विषबाधा.. बालगृहातील आहारावर प्रश्न चिन्ह

बीड जिल्ह्यातील शिरूर येथील योगेश्वरी बालगृहातील 8 ते 10 मुलांना विषबाधा झाल्याने खळबळ उडली.

  • Share this:

बीड, 4 जुलै- बालगृहातील 10 मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी दुपारी उघडकीस आली. या मुलांवर बीड जिल्हा रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. मुलाची प्रकृती स्थीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील शिरूर येथील योगेश्वरी बालगृहातील 8 ते 10 मुलांना विषबाधा झाल्याने खळबळ उडली. बाल सुधारगृह प्रशासनाला विचारले असता जेवणातून नाही तर मुलांनी घरून आणलेला चिवडा खाल्याने पोटात दुखू लागल्यामुळे नांदुर घाट येथील शासकीय रुग्णालयात उपचार केले. शाळा सुरू झाल्याने आठ दिवसांपूर्वीच शाळेच आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुलांना बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर्व मुलांचा प्रकृती स्थीर असल्याचे बालगृहाचे संचालक डॉ. तांबडे यांनी सांगितले.

काय म्हणाली मुले..?

दुपारच्या जेवणात चपाती, भाजी, भात खाल्यामुळे आम्हाला गरगर फिरायला लागल्याचे पीडित मुलांनी सांगितले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा खासगी वसतिगृह आणि बालगृहामधील मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या बालगृहात निकृष्ट दर्जाचे अन्न तर दिले जात नाही ना? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

ऑटो रिक्षातून पडून धुळ्यात शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

प्रशासकीय अनास्थेने धुळे जिल्ह्यात गुरूवारी एका शाळकरी मुलाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. शाळेतून घरी परतणार्‍या पाचवीतील विद्यार्थ्याचा ऑटो रिक्षातून खाली पडल्‍याने जागीच मृत्यू झाला आहे. शिंदखेडा तालुक्यातील साहुर येथे दुपारी ही घटना घडली. दर्शन मनोज कोळी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने हा अपघात झाल्याचा आरोप दर्शनच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, नातेवाईकांनी दर्शनचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून आपला रोष व्यक्त केला.

मिळालेली माहिती अशी की, शिंदखेडा तालुक्यातील साहुर येथे राहणारे विद्यार्थी शिंदखेडा तसेच धमाणे गावात शाळेत जातात. यासाठी रिक्षाचा वापर केला जातो. याच रिक्षामध्‍ये अनेक प्रवासी देखील असतात. आज नेहमीप्रमाणे साहुर येथील दर्शन मनोज कोळी हा पाचवीतील विद्यार्थी शाळेत गेला. शाळेतून रिक्षामधून (एमएच-18- जीजे- 4610) दर्शन हा घराकडे परत येत होता. ही रिक्षा गावाजवळ आली असता एका खड्‍ड्‍यात चाक गेल्याने दर्शन रिक्षाच्या बाहेर फेकला जावून मागील चाकात आला. गंभीर जखमी झाल्याने त्‍याचा मृत्‍यू झाला.

SPECIAL REPORT : असंवेदनशील सरकार! धरण गळती रोखण्यासाठी लावली ताडपत्री

First published: July 4, 2019, 8:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading