मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Wardha : निधीअभावी 15 वर्षापासून रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपूल अपूर्ण

Wardha : निधीअभावी 15 वर्षापासून रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपूल अपूर्ण

आरओबीचे अपूर्ण काम ही समस्या कायम आहे. आता रेल्वे प्रशासनाने कामाला सुरुवात केली असली तरी पूलाचे काम दिरंगाईने होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे होणारा त्रास पाहून कंत्राटदार कांबळे यांनी पंधरा वर्षांपूर्वी निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी आर्वी रोडच्या रेल्वे फाटकावरील रेल्वे उडाण पुलाच्या (आरओबी) बांधकामाच कंत्राट घेतले.

पुढे वाचा ...
वर्धा, 16 जून : शहरातील दळणवळण सोयीस्कर व्हावे आणि रेल्वे फाटकापासून नागरिकांची होणारी गैरसोय टाकळण्यासाठी पुलगाव येथील रेल्वे गेट येथील उड्डाणपूलाच्या (आरओबी) (Road Over Bridges)  बांधकामाला मंजुरी देण्यात आली. मात्र, गेल्या पंधरा वर्षांपासून केवळ खांब उभे राहू शकले आहेत. यामुळे नागरिकांना होणार त्रास कमी होताना दिसत नसून पूलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. तर पुलाचे काम लवकरच पूर्ण केलं जाईल, असे संबंधित अधिकाऱ्याकडून सांगितलं गेलं आहे.   वाचा- Akola Special Report : हवामान विभागाचा अंदाज चुकला, त्यात आमचा काय दोष? शेतकरी हवालदिल! आरओबीचे अपूर्ण काम ही समस्या कायम आहे. आता रेल्वे प्रशासनाने कामाला सुरुवात केली असली तरी पूलाचे काम दिरंगाईने होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.  रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे होणारा त्रास पाहून कंत्राटदार कांबळे यांनी पंधरा वर्षांपूर्वी निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी आर्वी रोडच्या रेल्वे फाटकावरील रेल्वे उडाण पुलाच्या (आरओबी) बांधकामाच कंत्राट घेतले. सुमारे पाच वर्षात सत्तर अर्धवट खांब तयार झाले. पण आता हळुहळू सामान जमा करत ठेकेदार गावभर उसनवारी करून पळून गेला. अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून पुलासाठी निधीही मिळाला नसल्याने गेल्या दहा वर्षांपासून पूलाचे काम अर्धवट राहिल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक नागरीक या पूलाच्या खांबावर कपडे सुकवत आहेत तर काही जण प्रचार, जाहिरातीचे होर्डिंग लावत आहेत. आमदार, खासदारांचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.  वाचा- बीडच्या मुलांनो इकडे लक्ष द्या! इथल्या ITI मध्ये 1-2 वर्षांचा कोर्स संपताच, लगेच लागतो जाॅब, वाचा SPECIAL REPORT पालकमंत्र्यांचा दावा फेल रेल्वेच्या दोन्ही बाजूला मोठमोठ्या खांबांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या चार महिन्यांत रेल्वे मार्गावर उड्डाण पूल बांधण्याचा दावा पालकमंत्र्यांनी केला होता पण आजतागायत पूल अपूर्ण आहे.  15 वर्षांपासून  उड्डाणपूलाचे काम रखडले आहे. शासन चौफेर रस्ते बनवत असून 15 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या चार उड्डाणपूलापैकी तीन आरओबीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी राजकीय द्वेषामुळे अर्धे काम अपूर्ण आहे, असे पुलागव शहरातील नागरीक सतिश जयस्वाल यांनी सांगितले.  पुलाचे काम लवकर व्हायला पाहिजे, असे स्थानिक नागरीक विलस गायकवाड यांनी सांगितले. पूलाच्या अर्धवट कामासाठी प्रशासनाला विचारले असता उपविभाग अभियंता अरुण मुत्यलवार म्हणाले की, पूलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
First published:

Tags: Wardha news

पुढील बातम्या