कराड शहराला पुराचा विळखा, यशवंतराव चव्हाणांची समाधी पाण्यात

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने हाय अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 14 फुटावरून 16 फुटांवर उघडण्यात आले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 06:38 PM IST

कराड शहराला पुराचा विळखा, यशवंतराव चव्हाणांची समाधी पाण्यात

कराड 6 ऑगस्ट : मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि कोयना नद्यांना महापूर आलाय. त्यामुळे कराड शहराला पूराचा विळखा पडलाय. आकाशातून कोसळणारा पाऊस, धरणांमधून सोडलं जाणारं पाणी यामुळे  नद्यांच्या पाण्याची पातळी वाढलीय. त्याचबरोबर नाले आणि ओढ्यांमधूनही प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्यानं हा सगळा परिसर जलमय झालाय. कराडमध्ये कृष्णा नदीच्या काठावर प्रीती संगमावर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. ही समाधीही पाण्याखाली गेलीय. अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांना सुरक्षीत स्थळी आश्रय घ्यावा लागतोय.

तुम्हालाही मिळू शकते Netflix मध्ये नोकरीची संधी, 'या' उमेदवाराला मिळेल पसंती

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने हाय अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 14 फुटावरून 16 फुटांवर उघडण्यात आले आहेत. कोयना धरणात 102 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणातून एकूण 1 लाख 19 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग होतोय.

150 लोक पुरात अडकले

फलटण तालुक्यातील साठे गावच्या जाधव वस्तीवरचे 150 लोक पुरात अडकले आहेत. वीर धरणातील पाणी सोडल्यामुळे नीरा नदीला आला पूर आलाय. महाबळेश्वर इथले टॅकर्स घटना स्थळी दाखल असून बोटच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू आहे.

Loading...

Article 370 : हडबडलेल्या पाकिस्तानने भारताला दिली युद्धाची धमकी

उजनी धरणही भरलं

दहा दिवसांपूर्वी वजा पाणीसाठा असणारे उजनी धरण पुण्यात आणी खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील जोरदार पाऊस आणी इतर धरणातील विसर्ग करणाऱ्या नद्यांच्या पाण्यामुळे जवळपास भरलं आहे. आता धरणात 92.79 टक्के  उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. अवघ्या काही तासांतच उजनी धरण शंभरी पार करेल.  मोठया विसर्गामुळे धरणाच्या 16 दरवाज्यांमधून दीड लाख  क्यूसेकने भिमा नदीत पाण्याचा विसर्ग चालू करण्यात आला आहे. त्यामुळे निरानरसिंहपूरचा नविन बांधलेला पूल आज पाण्याखाली गेला.  त्यामुळे निरानरसिंहपूरचा आणि अकलूजचा संपर्क तुटला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2019 05:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...