मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /चिपळूणमधील पूरग्रस्तांच्या खात्यात उद्यापासून जमा होणार पैसे, ‘न्यूज18 लोकमत’च्या बातमीचा इम्पॅक्ट

चिपळूणमधील पूरग्रस्तांच्या खात्यात उद्यापासून जमा होणार पैसे, ‘न्यूज18 लोकमत’च्या बातमीचा इम्पॅक्ट

चिपळूणमधील बाधित पूरग्रस्तांना सरकारनं जाहीर केलेल्या 10 हजारांच्या (Rs. 10 thousand) मदतीपैकी 5 हजार रुपये (Rs. 5 thousand) सोमवारपासून जमा व्हायला सुरुवात होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

रत्नागिरी, 1 ऑगस्ट : कोकणात (Kokan) कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) अनेक भागात पूर (Flood) आला असून सर्वसामान्यांची वाताहत झाली आहे. विशेषतः चिपळूणमध्ये (Chiplun) तर अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात सर्वाधिक नुकसान झालं आहे. चिपळूणमधील बाधित पूरग्रस्तांना सरकारनं जाहीर केलेल्या 10 हजारांच्या (Rs. 10 thousand) मदतीपैकी 5 हजार रुपये (Rs. 5 thousand) सोमवारपासून जमा व्हायला सुरुवात होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

‘न्यूज18 लोकमत’च्या बातमीचा परिणाम

कोकणातील पूरग्रस्तांना वेळीच मदत करणं गरजेचं असून सरकारदरबारी होत असलेल्या विलंबाबद्दल ‘न्यूज18 लोकमत’नं सवाल उपस्थित केले होते. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना वेळेत मदत मिळणं गरजेचं असून वेळ निघून गेल्यावर मिळालेल्या मदतीला मोल राहत नसल्याचा मुद्दा ‘न्यूज18 लोकमत’नं मांडला होता. त्याची दखल घेत आता सोमवारपासून मदत जमा व्हायला सुरुवात होईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

अर्धी मदत तातडीने

सरकारनं प्रत्येक पूरबाधित कुटुंबाला 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यापैकी 5 हजार रुपये तातडीनं पूरग्रस्तांच्या खात्यात जमा होणार आहेत. नागरिकांना तातडीनं थोडाफार दिलासा मिळावा, या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. चिपळूण आणि रत्नागिरीतील बाधित ग्रंथालयांनादेखील तातडीनं 5 लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक आणि संग्रहालयाला मंत्री उदय सामंत यांनी 50 लाखांचा निधी जाहीर केला आहे.

हे वाचा -देवेंद्र फडणवीसांच्या या 26 मागण्या मुख्यमंत्री मान्य करणार?

प्रसाद लाड यांच्यावर टीका

शिवसेना भवन फोडण्याची भाजप आमदार प्रसाद लाड यांची भाषा त्यांची वैचारिक दिवाळखोरी दाखवते, अशी टीका मंत्री सामंत यांनी केली आहे. शिवसेनाभवन हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेनं मंदीर असून जनताच भाजपला उत्तर देईल, असं ते म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Rain flood, Ratnagiri