जा रे जा रे पावसा! सांगली-कोल्हापूरमध्ये गंभीर पूरस्थिती, दीड लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं

पुणे विभागातील कृष्णा आणि भीमा खोऱ्यापैकी भीमा खोऱ्यात पावसाचा जोर ओसरल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 08:58 AM IST

जा रे जा रे पावसा! सांगली-कोल्हापूरमध्ये गंभीर पूरस्थिती, दीड लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं

पुणे,  8 ऑगस्ट : पुणे विभागातील कृष्णा आणि भीमा खोऱ्यापैकी भीमा खोऱ्यात पावसाचा जोर ओसरल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र कृष्णा खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचा जोर अद्यापी कायम आहे. सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पूरस्थिती अजूनही गंभीर असली तरी मदत आणि बचाव कार्ययुद्ध पातळीवर सुरू आहे. कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 4 लाख क्युसेकपर्यंत वाढवण्यात आल्याने पूरस्थिती नियंत्रणात येईल. विभागातील 1 लाख 32 हजार 360 पूरबाधितांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.  बचाव व मदत कार्यावर प्रशासनाने भर दिला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुणे विभागातील पूरस्थिती आणि बचाव कार्याची माहिती देण्यासाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

(पाहा :VIDEO: धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ता दुभंगला)

डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातील 58 तालुक्यांपैकी 30 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. पुणे विभागात सरासरीच्या 137 टक्के पाऊस झाला आहे. विभागातील प्रमुख कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून भीमा खोऱ्यातील पावासाचा जोर कमी झाल्यामुळे या भागातील पूरस्थिती नियंत्रणात आहे. मात्र या खोऱ्यातील उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशीरज, मंगळवेढा तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील 7 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. यामध्ये पंढरपूर शहरातील अडीच हजारहून अधिक नागरिकांचा समावेश आहे.

(पाहा :दारू वाईट...घसा ओला करायला ओंडक्यावर स्वार होऊन दारूड्या पोहोचला दुकानात!)

1 लाख 32 हजार 360 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

Loading...

पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील 136 गावे पुरामुळे बाधीत झाली असून जिल्ह्यातून 51 हजार 785 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

सातारा : 6 गावे पुरामुळे बाधीत झाली असून 6 हजार 262 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

सांगली : 18 गावे पुरामुळे बाधीत झाली असून 53हजार 281 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

सोलापूर : 7 हजार 749 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

पुणे : 13 हजार 336 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

पूरामध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू असून सर्वच लोकांना बोटीने हलविणे शक्य नसल्याने महिला, गरोदर महिला, वृद्ध, रुग्णांना पहिल्यांदा हलवण्यात येत आहे, तर उर्वरित लोकांना गावातील उंच ठिकाणी नेण्यात येत आहे. स्थलांतरीत केलेल्या लोकांना तयार शिजवलेले अन्न पोहोचवण्यात येत आहे. त्याच बरोबर रॉकेल आणि मेणबत्ती व इतर जीवनाश्यक साहित्यही पोहोचवण्यात येत आहे.

(वाचा :मेरे प्यारे देशवासियों! पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करण्याची शक्यता)

पाणी पुरवठा योजनांना फटका

पूर स्थितीचा फटका विभागातील पिण्याच्या पाणी पुरवठा करण्याच्या योजनांना बसला असून कोल्हापूर जिल्ह्यातील 390 गावातील, सांगली जिल्ह्यातील 113 गावातील, सातारा जिल्ह्यातील 91 गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत. काही ठिकाणी वीज पुरवठा नसल्याने तर काही ठिकाणी पाणी पुरवठा योजनांच्या मोटारी पाण्यात गेल्याने या योजना बंद पडल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे विभागातील 1 लाख 562 ट्रान्सफॉर्मर पैकी 10 हजार 882 ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात आले आहेत. यामध्ये काही पूराच्या पाण्याने बाधीत झाले असून यामुळे अंदाजे 2 लाख 756 वीज वितरण कंपनीचे ग्राहक बाधीत झाले आहेत.

नियंत्रण कक्ष सज्ज

विभागात जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच, पाटबंधारे विभाग, महानगरपालिका आणि पोलीस विभाग येथेही 24 तास नियंत्रण कक्ष सुरू आहे आपत्कालीन साहित्य, बोटी, लाईफ जॅकेटस्, लाईफ बॉयज्‌, फ्लोटिंग पंप, मेगा फोन, बी. ए. सेट, सेफ्टी हेल्मेटस्‌, टॉर्च इत्यादि साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. पुरेशा औषध साठ्याबाबत तसेच साथीचे रोग पसरू नये, यासाठी खबरदारी घेण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

अफवांवर विश्वास ठेवू नये

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन अत्यंत गांभीर्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच बचाव व पुनर्वसन कार्यात नागरिकांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

धरणातील पाणीसाठा

-  पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील सर्व धरणे 100 % भरली आहेत.

बापरे! 15 दिवसांचं बाळ अडकलं पुरात, पाहा थरारक रेस्क्युचा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 08:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...