Home /News /maharashtra /

VIDEO: जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, खेड शहरातील अनेक भागांत शिरलं पाणी

VIDEO: जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, खेड शहरातील अनेक भागांत शिरलं पाणी

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील सर्वात मोठी नदी असणाऱ्या जगबुडी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्याच्या घडीला जगबुडी नदी धोक्याच्या पातळीपेक्षाही जास्त भरून वाहत आहे.

रत्नागिरी 19 जून : सध्या अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची (Rain in Maharashtra) नोंद झाली आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत बरीच वाढ झाली आहे. तर, काही नद्यांनी धोक्याची पातळीदेखील ओलांडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील सर्वात मोठी नदी असणाऱ्या जगबुडी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्याच्या घडीला जगबुडी नदी धोक्याच्या पातळीपेक्षाही जास्त भरून वाहत आहे. नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असल्यानं नदीकिनारी असणाऱ्या खेड शहरातील काही भागांमध्ये आज पहाटे पाणी शिरल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. यामुळे, तालुक्यातील अनेक अंतर्गत मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहेत. नदीच्या पाणी पातळीच सलग होणारी ही वाढ पाहता नदी किनारी प्रशासनाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. तसंच प्रशासनानं नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे. भुशी डॅम ओव्हरफ्लो; पण वीकएंडला चुकूनही लोणावळ्याकडे जाऊ नका! हे आधी वाचा.. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा (Rain in Ratnagiri) इशारा कायम असून 20 जून पर्यंत मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कुलाबा वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील खेड्यापाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने 20 जून पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसंच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Rain flood, Ratnagiri

पुढील बातम्या