• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • यंदाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत, जनतेला केलं आवाहन

यंदाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत, जनतेला केलं आवाहन

Uddhav Thackeray Birthday 27th July: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांचा 27 जुलैला 60 वा वाढदिवस (Birthday)आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 जुलै: सध्या राज्यावर एकामागोमाग एक संकट येत आहेत. आता राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. तर काही ठिकाणी महापुराचं (Flood) संकट ओढावलं आहे. त्यात कोरोना व्हायरससारख्या (Corona Virus) महामारीचा सामना राज्यातल्या जनता करत आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा 27 जुलैला 60 वा वाढदिवस (Birthday) आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.  वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मीडिया आणि ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी केली विनंती राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम असून संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्तानं कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. Breaking News: बचावकार्य बोटच अडकली पुराच्या पाण्यात, Live Video मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पूरग्रस्तं चिपळूण (Flood-hit Chiplun) मधील बाजारपेठ, चिंचखरी नाका आणि अभिरुची हॉटेल येथे येऊन व्यापारी, स्थानिक नागरिक आणि छोटे छोटे व्यवसायिकांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हाधिकारी आणि आपतकालीन विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करून महापूराच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत देण्याचं जाहीर केलं आहे. पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. हवामान बदलाचा फटका बसला आहे. आपण वस्तूस्थिती स्वीकारली पाहिजे. संकटांचा धोका लक्षात घेता एनडीआरएफच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात एक टीम तयार केली जाणार आहे. कोकणात पूर व्यवस्थापन उभारणार आहोत. वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन या सर्व सबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. राज्य आपत्ती निवारण दले म्हणजेच एसडीआरएफ आहेच पण ते अधिक सक्षम करु अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली.
  Published by:Pooja Vichare
  First published: