Home /News /maharashtra /

नागपुरकरांना दसऱ्याची भेट,महा मेट्रो ट्रॅकवर !

नागपुरकरांना दसऱ्याची भेट,महा मेट्रो ट्रॅकवर !

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महा मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.

30 सप्टेंबर : मुंबईनंतर नागपूरची पहिलीवहिली मेट्रो अखेर ट्रॅकवर आलीये. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महा मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. नागपूर मेट्रोच्या मिहान कार डेपो ते खापरी या दरम्यान मेट्रो रेल्वे धावणार आहे.  यावेळी, महामेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कामाच्या गुणवत्तेबद्दल शंभर टक्के समाधानी आहोत हे नितीन गडकरींनी मान्य केल्यामुळे या प्रकल्पाला आयएसओपेक्षाही मोठे मानांकन मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. नागपूर शहरात रुळावरून मेट्रो धावतांना पाहून माझ्यासकट संपूर्ण नागपुरकरांचा आनंद गगनात मावत नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. तर मेट्रो प्रकल्प हा जनतेची संपत्ती आहे. मला किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यातून कुठलेही लक्ष्मीदर्शन झालेले नाही असं आपल्या शैलीत सांगून नितीन गडकरी यांनी उपस्थितांना हसवून सोडलं. मेट्रो प्रकल्पावर आपली बारीक नजर असून चूक किंवा विलंब झाला तर कंत्राटदार असो वा अधिकारी कुणाला सोडणार नाही अशी ताकीदही गडकरींनी दिली. यावेळी गडकरींनी मेट्रो कन्हान पर्यंत आणि बुट्टीबोरी पर्यंत नेण्याची सुचना केली यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरच यावर निर्णय जाहीर करू असं सांगितलं.
First published:

Tags: Nagpur, Nagpur metro, देवेंद्र फडणवीस, नागपूर मेट्रो, नितीन गडकरी, महा मेट्रो

पुढील बातम्या