Home /News /maharashtra /

कर्नाटकात भीषण कार अपघातात पुण्यातील ५ कामगार जागीच ठार

कर्नाटकात भीषण कार अपघातात पुण्यातील ५ कामगार जागीच ठार

विजयपूर इथं बबलेश्वर तालुक्यातील होनगनहळ्ली गावाजवळ हा अपघात झाला.

    सागर सुरवसे, प्रतिनिधी सोलापूर, 21 नोव्हेंबर : कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यात पुण्यातील कामगारांचा बोलेरो गाडी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २ जण गंभीर जखमी आहे. जखमींना नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विजयपूर इथं बबलेश्वर तालुक्यातील होनगनहळ्ली गावाजवळ हा अपघात झाला. कामगारांची बोलेरो कार Mh12 QG - 4766 ही ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात बोलेरो कारचा पूर्णपणे चुराडा झाला. बोलेरो कारमधील ५ जण जागेवरच मृत पावले. यात २ जण गंभीर जखमी आहे. मृत पावलेले सर्व जण हे पुण्यातील असून ते महामार्गावरील कामगार आहे. हे सर्व कामगार पुण्यातील राज कंपनीचे कामगार असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. या अपघाताबाबतची माहिती कंपनीला कळवूनही व्यवस्थापनाकडून कोणतीच प्रतिक्रिया न आल्याने कामगार संतप्त झाले आहे. दरम्यान, या अपघाताप्रकरणी बबलेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, पुणे-इंदुर महामार्गावर अनकाई किल्ल्याजवळ पहाटे ५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मारुती एर्टिगा कार ही मनमाडच्या दिशेनं कोपरगावला जात होती. तर आयशर ट्रक हा मनमाडच्या येवल्याकडे येत होता. कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे विरुद्ध बाजूने येणाऱ्या आयशर ट्रकवर कार आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. =====================
    First published:

    Tags: Car accident, Karnataka, Pune, Workers, अपघात, कार अपघात

    पुढील बातम्या