सोलापूरमध्ये मालगाडीचे 5 डबे घसरले

सोलापूरमध्ये मालगाडीचे 5 डबे घसरले

  • Share this:

30 एप्रिल : सोलापूरमधील दुधणी स्थानकादरम्यान ब्रेक फेल झाल्याने इंजिनसहित मालगाडीचे काही डबे घसरले. त्यामुळे दक्षिण भारतातली वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास रात्री 12.30च्या वाजता झालेल्या या अपघातात मालगाडीचे 5 डबे रुळावरून घसले असून, त्यामुळे वाडी-लातूर-मनमाड या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, सुमारे 12 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

दुधनीनजिक रुळांना तडे गेल्याने दक्षिण भारतात जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे दक्षिण भारताचा संपर्क तुटला आहे. वाडी जंक्शन वरुन होटगी स्थानकाकडे ही मालगाडी येत होती गाडी. यामध्ये सिमेंटसाठी लागणारा कच्चा माल घेऊन ही मालगाडी येत होती. दरम्यान ही घटना समजताच रेल्वे पोलीस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊ रेल्वेरूळ दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु केलं आहे.

First published: May 1, 2017, 10:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading