प्रविण मुधोळकर, नागपूर 14 जून : परीक्षेतल्या अपयशामुळे खचून नागपुरात गेल्या काही दिवसात पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकीकडे अशी निराशा विद्यार्थ्यांमध्ये असतांना मृत्युच्या दाढेतून परत आलेल्या पाखी मोर या विद्यार्थींनीने बारावीत 96 टक्के गुण मिळविले आहे. पाच महिने कोमात राहुनही नंतर तिने कठिण परिश्रमाच्या बळावर घवघवीत यश मिळवलं.
दहावी - बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा अपयश आले तर काही विद्यार्थी खचतात आणि चुकीचे पावले उचलतात. पण आयुष्यात अनेक अडचणींना समोर जात यश संपादित करणारेही विद्यार्थी आहेत. अपयशामुळे खचून नागपुरात गेल्या काही दिवसात कमी गुण मिळाल्यामुळे खचून पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पण अपयशाने खचून जाऊ नका असे आवाहन विद्यार्थ्यांना सर्व स्थरातून केलं जातंय.
नागपुरच्या मोहन नगरातील खलाशी लाईन परिसरात राहणाऱ्या 16 वर्षीय चैतालीने दहावीत 48 टक्के मार्क मिळाले होते. लहानपणापासून उत्तम गुण कमविणाऱ्या चैतालीला कमी मार्कामुळे धक्का बसला आणि तिने घरी ठेवलेले किटकनाश पिऊन आपल्या जीवनाचा प्रवास संपविला. प्रसन्न चेहरा आणि सदैव हसतखेळत राहणारी चैताली आपल्या आयुष्याचा असा अंत करेल याच्यावर तिच्या मैत्रिणींचा विश्वासच बसत नाही.
चैतालीच्या कमी आणि तिच्या मैत्रिणींना जास्त गुण मिळाल्याने त्या चांगल्या काँलेजात जातील यातून तणावातून तिने हे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
गेल्या काही दिवसात नागपुरात कमी गुण मिळाल्यामुळे पाच विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य संपविले आहे. एकीकडे अशी निराशा विद्यार्थ्यांमध्ये असतांना मृत्युच्या दाढेतून परत आलेल्या पाखी मोर या विद्यार्थिनीने बारावीत 96 टक्के गुण मिळविलेत. घरून ट्युशन क्लासला दुचाकीने जात असतांना एका भरधाव वाहनाने तिला धडक दिली होती. या अपघातनंतर पाच महिने कोमात राहिल्या नंतर पाखीने बारावीचे परिक्षा दिली आण 96 टक्के गुण मिळविले.
पाखीने कमी गुण मिळाल्यावर किंवा अपयश पदरी पडणाऱ्या विद्यार्थ्यांना हताश न होण्याचे आवाहन केले आहे. जगात कुठलेही संकट आले तरी घाबरून जाऊ नका असे पाखीने सांगितिले आहे. पाखीसोबत तिचे आईवडिलांनीही तिला अपघातानंतर आपल्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केले.
कुठल्याही परिस्थीतीत विद्यार्थ्यांनी खचून न जाता संकटावर मात केली पाहिजे. पालकांनीही मुलांवर जास्त गुणांसाठी आग्रह न धरता त्यांना झेपेल त्याच प्रमाणात अपेक्षा ठेवली पाहिजे असं तज्ज्ञांचं मत आहे.