खाऊ समजून खाल्लं भुईमुगाचं बियाणं; एकाचा मृत्यू तर 4 बालकांची मृत्यूशी झुंज

खाऊ समजून खाल्लं भुईमुगाचं बियाणं; एकाचा मृत्यू तर 4 बालकांची मृत्यूशी झुंज

भुईमुगाचं रासायनिक प्रक्रिया केलेले बियाणं मुलांच्या आजोबांनी पेरणीसाठी पिशवीत घरी आणलं होत.

  • Share this:

धुळे, 14 जुलै: खाऊ समजून भुईमुगाचं बियाणं खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील पाच बालकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत एका पाच वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर पाच भावंडांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. धुळे तालुक्यातील अजनाळे गावात ही घटना घडली आहे. पाचही बालकांना धुळ्यातील ACPM नॉन कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सगळ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा...लॉकडाऊनमध्ये धक्कादायक प्रकार! नवरदेवाला ठोकल्या बेड्या, महिला एजंट फरार

अजनाळे गावातील आदिवासी पवार कुटुंब हे शेती काम करतात. दरम्यान भुईमुगाचं रासायनिक प्रक्रिया केलेले बियाणं मुलांच्या आजोबांनी पेरणीसाठी पिशवीत घरी आणलं होत. मात्र, अनावधानानं बियाणं सुरक्षित ठेवण्यास ते विसरले. यावेळी घरात खेळणाऱ्या मुलांची पिशवीवर नजर पडली. नेहमी प्रमाणे आजोबांनी आपल्यासाठी खाऊ आणला असेल, असं समजून मुलांनी एकत्र येत आजोबांनी ठेवलेली पिशवी उघडली आणि त्यात ठेवलेले भुईमुगाचं रासायनिक बियाणं मुठ भरून भरून खाऊ लागले. काही क्षणातच मुलांना उलट्या व जुलाब होऊ लागल्या. अचानक झालेल्या या प्रकारानंतर गोंधलेल्या पालकांना झालेला प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ रुग्णालतात उपचारासाठी आणलं. मात्र, पाच वर्षांच्या शमशेर पवार याची प्रकृती खूपच खालावल्यानं त्याचा दुर्दवी मृत्यू झाला तर इतर चार भावंडांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

धनवीर शेरसिंग पवार (2), ननवीर शेरसिंग पवार (7) यांचेसह चुलत बहीण नकाशा सोन्या पवार (12) आणि भाऊ शोर सोन्या पवार (5) या चार बालकांवर उपचार सुरू आहेत. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहेत. जवाहर मेडिकल रुग्णालयाचे डॉक्टर बालकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा..बापरे! ढगफुटीसारखा पाऊस, 40 ते 50 एकरातील अंकुरलेली पिकं वाहून गेली

दरम्यान, समशेरच्या दुर्दवी मृत्यूमुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विषबाधेच्या या घटनेने अजनाळे गावात शोककळा पसरली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 14, 2020, 5:46 PM IST

ताज्या बातम्या