मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आरेवारे समुद्रात एकाच कुटुंबातील 6 जण बुडाले, 5 जणांचा मृत्यू

आरेवारे समुद्रात एकाच कुटुंबातील 6 जण बुडाले, 5 जणांचा मृत्यू

रत्नागिरीच्या आरेवारे समुद्रात 6 जण बुडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात 6 पैकी एका महिलेला वाचवण्यात स्थानिकांना यश आलं आहे.

रत्नागिरी, ता. 03 मे : रत्नागिरीच्या आरेवारे समुद्रात 6 जण बुडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात 6 पैकी एका महिलेला वाचवण्यात स्थानिकांना यश आलं आहे. मात्र 5 जणांचा यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. आरेवारे समुद्र किनारी पर्यटकांची मोठ्याप्रमाणात रविवार असल्यामुळे गर्दी होती. आणि त्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या किनाऱ्यावर बोरीवलीमधून एक ग्रुप मजामस्ती करण्यासाठी आला होता. ते समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले. यातील एकाला स्थानिकांनी वाचवले पण 5 जणांचा यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. बोरिवलीच्या डिसोझा कुटुंबातले हे सर्व जण असून मृतांमध्ये 2 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. मृतांची नावं - केनेथ टिमोथी मास्टर्स (वय ५६) - मोनिका बेंटो डिसोझा (वय ४४) - सनोमी बेंटो डिसोझा (वय २२) - रेंचर बेंटो डिसोझा (वय १९) - मॅथ्यू बेंटो डिसोझा (वय १८) या अपघातात बचावलेली महिला रिटा डिसोझा वय ७०. हे सर्व एकाच परिवारातील होते जे फिरण्यासाठी रत्नागिरीला गेले होते.  
First published:

Tags: Aareware sea, Died, Ratnagiri, आरेवारे समुद्र, रत्नागिरी

पुढील बातम्या