Home /News /maharashtra /

कोरोनाचा धोका वाढला, मुंबईत आज आणखी नवे 5 रुग्ण, महाराष्ट्रातील आकडा 159 वर

कोरोनाचा धोका वाढला, मुंबईत आज आणखी नवे 5 रुग्ण, महाराष्ट्रातील आकडा 159 वर

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

    मुंबई, 28 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आणखी नवे कोरोनाचे 05 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर नागपुरात एका रुग्णाच्या टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं आता एकूण रुग्णांची संख्या 159 वर पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात मुंबईतील भाभा आणि कस्तुरबा रुग्णालयात 9 रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आता कोरोनाग्रस्तांची संख्या 91 झाली आहे. तर आतापर्यंत मुंबईत 05 जणांचाा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत संशयित रुग्णांसह 209 कॉरोनाग्रस्त दाखल आहेत. शुक्रवारी दिवसभरात एकूण 17 नवीन रुग्ण आढळले होते. सांगलीमध्ये नवे 12 रुग्ण तर नागपूरमध्ये 5 रुग्ण आढळले असून राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्याही तब्बल 159 वर पोहोचली आहे. नवी मुंबईत दीड वर्षाच्या बाळाला कोरोनाची लगण झाली आहे. देशभरात कोरोना व्हायरसचा धोका भारतात वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत एकूण 830 हून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर देशभरात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 67 रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिली आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Symptoms of coronavirus, Uddhav thacakrey

    पुढील बातम्या