मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 5 गणेशभक्तांचा जागीच मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 5 गणेशभक्तांचा जागीच मृत्यू

या भीषण अपघातामुळे उपरकर आणि मांजळकर या दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

या भीषण अपघातामुळे उपरकर आणि मांजळकर या दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

या भीषण अपघातामुळे उपरकर आणि मांजळकर या दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

दिनेश केळुसकर, प्रतिनिधी रत्नागिरी, 11 सप्टेंबर : मुंबई-गोवा महामर्गावर लांजा गावाजवळ वाकेड घाटात भीषण अपघात झालाय. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. राजापुरकडे जाणारी गणेशभक्तांची इको गाडी आणि मुंबईकडे जाणारी लक्झरी बस यांच्यात समोरासमोर टक्कर झाली आणि यामध्ये 5 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या गणेशोत्सवासाठी गावी जाण्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी पहायला मिळेते. यातच हा अपघात झाला आणि  यात इको गाडीतील 5 गणेशभक्तांचा मृत्यू झालाय तर इतर 5 जण गंभीर जखमी आहेत. या मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. राजापूरमधील उपरकर आणि मांजळकर हे दोन कुटुंब मुंबईहून गणेशोत्सवासाठी इको गाडीने आपल्या गावी चालले होते. दरम्यान, या अपघाताची माहिती स्थानिकांना मिळताच स्थानिक लोक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळी पोहचताच जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर पोलीस सध्या मृतदेह गाडीच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. या भीषण अपघातामुळे उपरकर आणि मांजळकर या दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या अपघातामुळे राजापूर परिसरातही खळबळ उडाली आहे.   VIDEO : ...आणि 'त्यांनी' रस्त्यावरील खड्ड्यात केलं बाळाचं बारसं!
First published:

Tags: Ratnagiri

पुढील बातम्या