पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, वर्षा विहारासाठी निघालेल्या 5 तरुणी जखमी

पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, वर्षा विहारासाठी निघालेल्या 5 तरुणी जखमी

पुणे-नाशिक महामार्गावर 2 कारचा भीषण अपघात होऊन त्यात पाच तरुणी जखमी झाल्या आहेत. तरुणी वर्षा विहारासाठी निघाल्या होत्या.

  • Share this:

रायचंद शिंदे, (प्रतिनिधी)

जुन्नर, 14 जुलै- पुणे-नाशिक महामार्गावर 2 कारचा भीषण अपघात होऊन त्यात पाच तरुणी जखमी झाल्या आहेत. तरुणी वर्षा विहारासाठी निघाल्या होत्या.

मिळालेली माहिती अशी की, पुणे-नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यातील कळंबजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारवर भरधाव वेगात आलेली दुसरी कार आदळली. रविवारी दुपारी 12 च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात पाच तरुणी जखमी झाल्या आहेत. त्यापैकी दोन तरुणींना गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने नारायणगाव येथे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व तरुणी नाने घाटात वर्षा विहारासाठी निघाल्या होत्या. महामार्गावर रस्त्याच्या बाजूला कच्च्या पट्टीवर उभ्या असलेल्या कारमधील सात जण थोडक्यात बचावले.

कळंब येथील राजेंद्र शिंदे यांनी कार (MH43AN6101)आप्पाचा ढाब्याच्या समोर हायवेवर उभी केली. कळंब येथील नातेवाईकांची ते वाट बघत होते. याच वेळी पुण्याकडून नारायणगावच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या कारने (MH14An1019) उभ्या कारला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, राजेंद्र शिंदे यांची कार डाव्या बाजूला असलेल्या भल्या मोठ्या खड्यात पलटी झाली. यात पाच तरुणींसह ड्रायव्हर जखमी झाला. यापैकी साक्षी संजय शिंदे, पूजा संजय शिंदे या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर धडक देणाऱ्या कारचा ड्रायव्हर फरार झाला आहे.

VIDEO: '...म्हणून शरद पवारांनी पार्थला बारामतीचं तिकीट दिलं नाही'

First published: July 14, 2019, 6:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading