• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • भिवंडीत चौथ्या मजल्यावरुन थेट तळमजल्यावर आली इमारतीची लिफ्ट, चार जण जखमी

भिवंडीत चौथ्या मजल्यावरुन थेट तळमजल्यावर आली इमारतीची लिफ्ट, चार जण जखमी

भिवंडी (Bhiwandi) शहरात एका पाच मजली इमारतीची लिफ्ट (Lift Collapse) कोसळल्याची घटना घडली आहे.

 • Share this:
  भिवंडी, 22 नोव्हेंबर: भिवंडी (Bhiwandi) शहरात एका पाच मजली इमारतीची लिफ्ट (Lift Collapse) कोसळल्याची घटना घडली आहे. विठ्ठल नगर येथील ग्लोबल कॉम्प्लेक्स मधील क्लासिक या पाच मजली इमारतीमधील लिफ्टचे रोप तुटल्यानं हा अपघात घडला. लिफ्ट चौथ्या मजल्या वरून थेट तळमजल्यावर आदळली. ही दुर्घटना घडली तेव्हा लिफ्ट मधील चार जण होते. या अपघातात लिफ्टमध्ये उपस्थित चारही जणजखमी झाले आहेत. ग्लोबल कॉम्प्लेक्स मधील क्लासिक बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या आरिफा यांच्या घरी ग्यारव्हीची नियाज निमित्त जेवणाचा कार्यक्रम असल्याने त्यांचे मित्र वसीम अन्सारी, निजाम शेख, जुबेर शेख हे आले असता जेवण करून रविवारी रात्री ते आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी तळमजल्यावर येण्यासाठी लिफ्टमध्ये शिरल्यानंतर गेट बंद करण्या अगोदरच लिफ्टचे लोखंडी रोप तुटलं आणि लिफ्टचा संपूर्ण सांगाडा थेट 50 फूट खाली कोसळली. या दुर्घटनेत पाय फॅक्चर झालेल्या जुबेर शेख यांनी ही माहिती दिली आहे. या दुर्घटनेत लिफ्टमध्ये असलेल्या तीन ही व्यक्तींना जबर मार लागला असून जुबेर शेख यांना खाजगी रुग्णालयात तर दोन जणांना शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस घटनास्थळी दाखल होत जखमींचे जबाब नोंदवून पोलिसांनी बिल्डर विरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे .
  Published by:Pooja Vichare
  First published: