• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • बापरे! साडेपाच फुटाच्या सापानं गिळले 10 अंडे; हालताही न आल्यानं झाली वाईट अवस्था

बापरे! साडेपाच फुटाच्या सापानं गिळले 10 अंडे; हालताही न आल्यानं झाली वाईट अवस्था

चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील एका गावात गव्हाऱ्या नागानं कोंबडीचे चक्क दहा अंडे गिळले होते. एवढे अंडे एकाच वेळी गिळल्यानं सापाला हलताही येत नव्हतं.

 • Share this:
  चंद्रपूर, 29 जून: चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील मूल तालुक्यातील लहान कोसंबी याठिकाणी एका गव्हाऱ्या नागानं (Snake) कोंबडीचे चक्क दहा अंडे गिळले (snake swallowed 10 eggs) होते. एकाच ठिकाणी एवढे अंडे मिळाल्यानं ताव मारणाऱ्या या सापाला अंडे पचवणं शक्य न झाल्यानं गिळलेले सर्व अंडे बाहेर काढावे लागले आहे. रात्रीच्या वेळी या विषारी नागानं एका शेतकऱ्याच्या घरात प्रवेश केल्यानं परिसरात भीती पसरली होती. पण सर्पमित्रानं सापाला सुरक्षित पकडल्यानंतर शेतकरी कुटुंबीयांच्या जीवात जीव आला. सर्प मित्रांनी पकडलेल्या विषारी सापाला मारोडा जंगलात सुखरूप सोडलं आहे. पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, मूल तालुक्यापासून सहा किमी अंतरावर असणाऱ्या लहान कोसंबी या गावातील पवन लोनबले यांच्या घरात रात्री साडे आठच्या सुमारास साडे पाच फुट लांबीच्या गव्हाऱ्या जातीच्या विषारी सापानं प्रवेश केला होता. घरातील एका कोपऱ्यात पिल्लं फोडण्यासाठी एका मोठ्या टोपलीत अकरा अंडी ठेवण्यात आली होती. या अंड्यावर कोंबडीही बसली होती. पण या सापानं थेट कोंबडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण कोंबडीनं सापाला चुकवून तेथून पळ काढला. कोंबडी अंड्यावरून उठताच सापानं टोपलीत ठेवलेल्या अंड्यावर ताव मारायला सुरुवात केली. घरात साप शिरल्याचं कळताचं लोनबले कुटुंबीयांचा थरकाप उडाल. लोनबले कुटुंबीयांनी शेजारच्यांच्या मदतीनं सर्पमित्रांना फोन केला. मूल येथील सर्पमित्र उमेश झिरे आणि तन्मय झिरे यांना फोन येताच ते तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पण सर्पमित्र येईपर्यंत सापानं इकडे कोंबडीचे दहा अंडे गिळले होते. हेही वाचा- दारूच्या नशेत तरुण थेट विषारी नागालाच भिडला, अंगावर काटा आणणारा VIDEO दहा अंडे गिळल्यानं सापाला जागचं हलाताही येत नव्हतं. गिळलेले अंडे पचवता न आल्यानं सापानं दहाच्या दहा अंडे पुन्हा तोंडावाटे बाहेर ओकले. पावसाच्या वातावरणामुळं सापानं घरात प्रवेश केला आणि अंड्यावर ताव मारला असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. या सापाला सर्पमित्रांनी सुखरुप पकडल्यानंतर लोनबले कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी परिसरातील बऱ्याच नागरिकांनी सापाला पाहण्यासाठी गर्दी केली होती.
  Published by:News18 Desk
  First published: