मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /10 नवजात बाळांचा मृत्यू झालेल्या भंडारा शासकीय रुग्णालयातला पहिला VIDEO

10 नवजात बाळांचा मृत्यू झालेल्या भंडारा शासकीय रुग्णालयातला पहिला VIDEO

आग लागल्यामुळे नुकतेच्या जन्मलेल्या 10 नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आग लागल्यामुळे नुकतेच्या जन्मलेल्या 10 नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आग लागल्यामुळे नुकतेच्या जन्मलेल्या 10 नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भंडारा, 09 जानेवारी : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ( Bhandara District General Hospital) आग लागल्यामुळे नुकतेच्या जन्मलेल्या 10 नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे.

भंडारा जिल्ह्यातील सर्व सामान्य रुग्णालय हे गरिब आणि दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी मोठे आधारवड आहे. त्यामुळे या रुग्णालयात सर्व प्रकारच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.  जन्मल्यानंतर नवजात बालकाला काही त्रास उद्भ्वल्यास, वजन कमी असल्यास, बाळाची प्रकृती ठीक नसल्यास त्याला अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये ( SNCU ) ठेवण्यात येत असते.

सामान्य रुग्णालयाच्या SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालक दाखल होती.  शनिवारच्या मध्यरात्री जवळपास 2 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले होते. त्यावेळी ड्युटीवर हजर असलेल्या परिचारिकेने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता.

त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNIC मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले तर औट बॉल युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला आहे.

सर्व रुग्णालयांचे होणार ऑडिट!

भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन अजित पवार यांनी दिले.

'अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरू ठेवण्याचे तसंच अन्य बालकांवरील उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले चौकशीचे आदेश

दरम्यान,  भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.

First published: