नांदेड निवडणुकीत होतोय व्हीव्हीपॅट यंत्रणेचा पहिला प्रयोग

नांदेड निवडणुकीत होतोय व्हीव्हीपॅट यंत्रणेचा पहिला प्रयोग

या यंत्रणेमुळे इव्हीएम मशीनमध्ये होणाऱ्या फेरफाराचा शोध ही लावता येईल आणि फेरफार होत असल्यास आळाही घालता येईल.

  • Share this:

नांदेड,11 ऑक्टोबर: नांदेडमध्ये आज महापालिकेची निवडणुक होते आहे.या निवडणुकीत होणाऱ्या मतदानात. देशभरात व्हीव्हीपॅट यंत्रणेचा पहिलाच प्रयोग एका प्रभागात होतोय. या यंत्रणेमुळे इव्हीएम मशीनमध्ये होणाऱ्या फेरफाराचा शोध ही लावता येईल आणि फेरफार होत असल्यास आळाही घालता येईल.

नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक दोनच्या मतदारांना मतदान केल्यावर पावती दिसणार आहे. म्हणजे, कुणाला मत दिलं याची पावती या मशीनमधून निघेल. थोडा वेळ दिसेल आणि नंतर मशीनमध्येच राहील. मतदानातली गुप्तता पाळण्यासाठी ती पावती मतदारांना मिळणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार होत असल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. त्याचे दखल घेऊन निवडणूक आयोगानं व्हीव्हीपॅट यंत्रणा आणली आहे. ही जर नांदेडमध्ये यशस्वी झाली तर भविष्यातल्या सगळ्या निवडणुकीत ती वापरली जाण्याची शक्यता आहे. त्याची आर्थिक तरतूदही निवडणूक आयोगानं केलीय.

First published: October 11, 2017, 9:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading