मुंबई, 24 ऑगस्ट: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली जात आहे. यानंतर आक्रमक शिवसैनिकांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं आहे. थोड्याच वेळापूर्वी नारायण राणेंना पोलिसांनी अटक केली. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी महत्व देत नाही, अशी मोजक्यात शब्दात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलीआहे.
मला काही बोलायचं नाही. मी त्याला फारसं महत्व देत नाही असं म्हणत त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात, असं शरद पवार म्हणालेत.
नारायण राणेंना अटक
नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं. त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. (Union Minister Narayan Rane arrested)
मोठी बातमी: नारायण राणे यांची तब्येत बिघडली, वैद्यकीय तपासणी सुरु
काय म्हटले होते नारायण राणे?
जनआशीर्वाद यात्रे दरम्यान पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले होते, शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना कोणताही निर्णय घ्याचा असेल तर तो मातोश्रीला विचारूनच घ्यावा लागतो, त्यांना मी फोन करणार आहे. शिवसेनेत ते फक्त नावापुरते मंत्री राहिले आहेत. एकही फाईल एकनाथ शिंदे यांना मातोश्रीला विचारल्या शिवाय सही करता येत नाही. जर ते आमच्याकडे आले तर स्वागतच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narayan rane, NCP, Sharad pawar, Shivsena