मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

हृदयद्रावक! आधी आईला अन् आता आजी व नातवाला कंटेनरनं चिरडलं; 7 वर्षानंतर घटनेची पुनरावृत्ती

हृदयद्रावक! आधी आईला अन् आता आजी व नातवाला कंटेनरनं चिरडलं; 7 वर्षानंतर घटनेची पुनरावृत्ती

Road Accident in Latur: अहमदपूर याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. 2014 साली आईचा ज्याप्रकारे मृत्यू (Mother Death) झाला होता. त्याचप्रकारे आजी आणि नातवाचा देखील मृत्यू (Grandmother and grandson death) झाला आहे.

  • Published by:  News18 Desk
अहमदपूर, 29 जून: लातूर जिल्ह्यातील अहमदपूर याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. 2014 साली आईचा ज्याप्रकारे मृत्यू (Mother Death) झाला होता. त्याचप्रकारे आजी आणि नातवाचा देखील मृत्यू (Grandmother and grandson death) झाला आहे. आईच्या मृत्यूनंतर सात वर्षांनी आजी आणि नातवाचा देखील त्याचप्रमाणे मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्कुटीवरून जाणाऱ्या आजी आणि नातवाला कंटेनरनं चिरडल्यानं (Container accident) दोघांचाही अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही सोमवारी सकाळ घडली आहे. सोमवारी सकाळी 25 वर्षीय नातू योगेश जयराज गोरे आपली 80 वर्षीय आजी कमलबाई शिवराज गोरे यांनी स्कुटीवर घेऊन कामानिमित्त बाहेर गेला होता. दरम्यान अहमदापुरातील थोडगा रस्त्यावरून जात असताना, समोरून आलेल्या अवजड कंटेनरनं या आजी आणि नातवाला जोरदार घडक दिली. दोघांना कंटेनरनं चिरडल्यानं दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. मृत आजी आणि नातवावर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मृत योगेश यानं पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्युटमधून शिक्षण घेतलं होतं. अलीकडेच 2020 मध्ये त्यानं पदवी प्राप्त केली होती. तो सध्या नोकरीच्या शोधात होता. तसेच पुण्यात कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे तो आपल्या गावी परत आला होता. दरम्यान हा अपघात झाल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत योगेशच्या आईचा देखील अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. हेही वाचा-दुसऱ्या मुलासोबत बोलली म्हणून प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीला विहिरीत ढकलले 2014 साली काही कामानिमित्त योगेशची आई स्कुटीवरून घराबाहेर गेली होती. दरम्यान एका कंटेनरनं त्यांना जोरदार टक्कर मारली होती. त्या अपघातत योगेशच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती काल (सोमवारी)  घडली आहे. ज्यामध्ये योगेश आणि त्याच्या आजीचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन वेगवेगळ्या घटनेत तिघांचा कंटेनरखाली चिरडून मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
First published:

Tags: Death, Latur, Road accident

पुढील बातम्या