Home /News /maharashtra /

रेल्वे विभागाच्या निर्णयामुळे पालघरकर संतापले, पहाटे लोकल ट्रॅकवर उतरले

रेल्वे विभागाच्या निर्णयामुळे पालघरकर संतापले, पहाटे लोकल ट्रॅकवर उतरले

3 डिसेंबरपासून अंमलात येणाऱ्या नव्या वेळापत्रकामध्ये मुंबईकडे जाणारी पहिली उपनगरीय गाडीची फेरी रद्द करण्यात आली आहे. त्याचे पडसाद आज पालघर व सफाळे इथं पाहण्यास मिळाले आहे.

    पालघर, 02 डिसेंबर : गेल्या आठ महिन्यांपासून मुंबईची लोकलचे (Mumbai Local) दार सर्वसामान्यांसाठी अजूनही बंदच आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून लोकल सेवा सुरू आहे. पण त्यातच डहाणू रोडपासून (dahanu road) मुंबईकडे येणाऱ्या लोकलची फेरी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पालघर (Palghar) येथील प्रवासी चांगलेच संतापले आहे. त्यामुळे आज सकाळी पालघर स्थानकावर प्रवाशांनी रेल्वे रोको आंदोलन केले आहे. 3 डिसेंबरपासून अंमलात येणाऱ्या नव्या वेळापत्रकामध्ये मुंबईकडे जाणारी पहिली उपनगरीय गाडीची फेरी रद्द करण्यात आली आहे. त्याचे पडसाद आज पालघर व सफाळे इथं पाहण्यास मिळाले आहे. आज सकाळी प्रवाशांनी थेट रेल्वे रुळावर उतरून प्रवाशांनी उत्स्फूर्त रेल रोको केले आहे. योगी आदित्यनाथ 'ठग', मनसेनं थेट भाजपच्या कार्यालयाबाहेर लावले होर्डिंग! कोरोना काळात मुंबईकडे अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी डहाणू रोड येथून पहाटे चार वाजून 40 मिनिटांनी सुटणारी चर्चगेट लोकल पश्चिम रेल्वे नवीन वेळापत्रकात रद्द केली आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार असल्याने या विषयावर निवेदन लोकप्रतिनिधींच्या दिले होते. त्याविषयी कोणतीही ठोस कृती न झाल्याने रेल्वे प्रवास यांनी आज पहाटे पालघर रेल्वे स्थानकात तसंच सफाळे रेल्वे स्थानकात रेल रोको केले. प्रवाशांच्या या आंदोलनामुळे  मुंबईकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस तसंच डहाणू कडे जाणारी लोकल रोखून ठेवण्यात आली होती. '...तर महाराष्ट्राचे तुकडे होतील', आरक्षणावरून उदयनराजेंचा इशारा मुंबई लोकल सध्या अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू आहे. डॉक्टर, आरोग्य सेवक, बँकेच्या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. नवरात्रीपासून महिलांनाही लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोनाची परिस्थिती पाहता अजूनही सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंदच आहे. राज्य सरकारने लोकल सुरू करण्याबद्दल प्रस्ताव पाठवला आहे, पण त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. लोकल सेवा बंद असल्यामुळे चाकरमान्यांना बेस्ट आणि एसटी बसने मुंबईकडे प्रवास करावा लागत आहे. पालघर आणि ठाण्यातील प्रवाशांचे यामुळे अतोनात हाल होत आहे. याआधीही लोकल सेवा सुरू करण्यासाठी विरारमध्ये रेल्वे प्रवाशांनी आंदोलन केले होते. आता पालघरकरांनीही रेल्वे विभागाच्या या निर्णयाला विरोध केला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Palghar, डहाणू, पालघर

    पुढील बातम्या