• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • आधी कार नंतर 'बर्निंग ट्रक'चा थरार, जळगावात एका मार्गावर 2 घटना, LIVE VIDEO

आधी कार नंतर 'बर्निंग ट्रक'चा थरार, जळगावात एका मार्गावर 2 घटना, LIVE VIDEO

 जळगाव (jalgaon) जिल्ह्यात आज एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं जळण्याची घटना समोर आली आहे.

जळगाव (jalgaon) जिल्ह्यात आज एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं जळण्याची घटना समोर आली आहे.

जळगाव (jalgaon) जिल्ह्यात आज एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं जळण्याची घटना समोर आली आहे.

 • Share this:
  जळगाव, 31 ऑक्टोबर : जळगाव (jalgaon) जिल्ह्यात आज एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं जळण्याची घटना समोर आली आहे. दुपारी कार (car burn) जळून खाक झाल्यानंतर अवघ्या काही तासांत एका ट्रकने (truck) पेट घेतला. या दोन्ही घटनांमध्ये वाहनांचं प्रचंड नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील बांभोरी नजीक कापूस वाहतूक करणाऱ्या ट्रकचे टायर फुटल्याने ट्रकला आग लागली. या घटनेत संपूर्ण ट्रक जळून भस्मसात झाला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही तासांपूर्वी याच भागात कारमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने संपूर्ण कार जळून भस्मसात झाली होती. त्यानंतर आता पुन्हा ट्रकला आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग काही विझली नाही. त्यानंतर घटनास्थळी महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर याच जळगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ दुपारी एका कारला अचानक आग लागली होती. सुदैवाने स्थानिकांच्या सतर्कतेमुळे कारमधील चार जणांचे प्राण वाचले. पण या घटनेत संपूर्ण कार जळून भस्मसात झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. घरातील लोकांच्या घोरण्यामुळे त्रस्त आहात का? हे 5 सोपे उपाय येतील तुमच्या कामी तर दुसरीकडे, लोंबकळत असलेल्या विद्युत तारांच्या संपर्कात आल्यामुळे फ्रीज घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकला आग लागल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या जुना आग्रा महामार्गावर घडली आहे. पक्क्या घरांच्या इच्छेनं ग्रामस्थांना आला जोश, फावडं उचलत बांधला नवा रस्ता फ्रीज घेऊन जाणाऱ्या धावत्या आयशर ट्रकने पेट घेतल्याची घटना मालेगावच्या जुना-आग्रा महामार्गावर घडली विजेच्या खाली लोंबकळत असलेल्या तारांच्या संपर्कात ट्रक आल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली मात्र तो प्रर्यंत आगीत ट्रकसह त्यातील सर्व फ्रीज जळून खाक झाले होते. ट्रकने पेट घेतल्यानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
  Published by:sachin Salve
  First published: