'आधी संभाजी भिडेंना अटक करा... मग कामकाज करु'

'आधी संभाजी भिडेंना अटक करा... मग कामकाज करु'

विधानपरिषदेत राष्ट्रवादीच्या आमदारांचा आक्रमक पवित्रा

  • Share this:

नागपूर, ता. 11 जुलै : संभाजी भिडेंना अटक होईपर्यंत विधानपरिषद चालू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतलाय. भिडे गुरुजींकडून सातत्याने होणारी वादग्रस्त वक्तव्ये आणि त्याच मुद्यांवरुन विरोधकांनी सरकारविरोधात तोफ डागत बुधवारी सभागृह दणाणून सोडलं. तुकोबां आणि ज्ञानोबा माऊलीच्या पालखीच्या दर्शनासाठी पुण्यात दाखल झाल्यानंतर भिडे गुरुजींनी मनुबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मनुने गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करुन हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवले. मनु हा संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं.

मीच पळवला राजदंड, श्रेय घेण्यावरूनही चढाओढ

आमदार नितेश राणे, प्रताप सरनाईकांनी राजदंड पळवला, 'नाणार'वरून विधानसभेत गोंधळ

या वादग्रस्त मुद्यावर विरोधकांनी आता आक्रमक भूमीका घेतली आहे. बुधवारी विधानपरिषदेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि दोनवेळा सभागृह तहकुब करण्यास भाग पाडले. आणि त्यानंतर लगेच शिवसिनेच्या सर्व आमदारांनी नाणारच्या मुद्यावरुन विधानपरिषदेत गोंधळ घातला आणि स्टंटबाजी करत नितेश राणे आणि सेना आमदारांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंड पळविला. एकंदर बुधवारी घडलेल्यी या सर्व घडामोडींमुळे विधानसभा अध्यक्षांना दिवसभरासाठी सभा तहकुब करावी लागली.

समलैंगिकता गुन्हा की अधिकार याचा निर्णय सुप्रीम कोर्टानच घ्यावा - केंद्राची भूमिका

पोलिसांनी साजरा केला 3 मुलींच्या बलात्काराचा आनंद, गावाला मटनाची दावत

राष्ट्रवादी आमदारांचा एल्गार पुकारला संभाजी भिडें यांचा कडाडून विरोध केला आहे. जोपर्यंत भिडे गुरुजींना अटक होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा पवित्रा घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी याच मुद्यावरुन विधी मंडळ नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत टीकास्त्र सोडले होते आणि भिडे गुरुजींचे त्यावेळेसचे वक्तव्य तपासून, त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यांच्यावर निश्चित कारवाई करु असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. यानंतर संभाजी भिडें यांचा विरोधात सरकार काय दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First Published: Jul 11, 2018 06:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading