सांगलीत प्रसिद्ध उद्योजकावर भरदिवसा गोळीबार, थोडक्यात वाचला जीव!

सांगलीत प्रसिद्ध उद्योजकावर भरदिवसा गोळीबार, थोडक्यात वाचला जीव!

भरदुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

आसिफ मुरसल, प्रतिनिधी

सांगली, 27 फेब्रुवारी : सांगली जिल्ह्यातील पलूस येथील प्रसिद्ध उद्योजक प्रदीप आनंदराव वेताळ यांच्यावर आज दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काच फुटून गोळी चालकाच्या बाजूच्या सीटमध्ये घुसल्यामुळे आनंदराव वेताळ हे थोडक्‍यात बचावले. भरदुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

आनंदराव वेताळ हे फौंड्री उद्योजक आहे. त्यांची पलूस एमआयडीसीमध्ये कारखाना आहे. आज सकाळी ते कारखान्यात गेले होते. दुपारी काम आटोपल्यानंतर जेवणासाठी घराकडे कारने निघाले. कारमध्ये ते एकटेच होते आणि स्वत: कार चालवत ते एमआयडीसीतून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळा नंबर एकजवळील घरासमोर आले. घरासमोर कार आल्यानंतर अचानक डाव्या बाजूने दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांचा चेहरा रूमालाने बांधलेला होता. दुचाकीवर मागे बसलेल्या तरूणाने काचेवरून वेताळ यांच्यावर गोळी झाडली. काच फुटून गोळी आतमध्ये वेताळ बसलेल्या जागेवरील सीटमध्ये घुसली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वेळीच वेताळ हे खाली वाकल्यामुळे थोडक्‍यात बचावले. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात नागरिक गोळा झाले. गोळीबार केल्यानंतर दुचाकीस्वार सुसाट पळून गेले.

गोळीबाराचा आवाज ऐकून वेताळ यांच्या घरातील सदस्य धावत आले. वेताळ यांच्यावर गोळीबार झाल्याचं पाहून घरातील सदस्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर कुटुंबीयांनी  पलूस पोलीस ठाण्यात गोळीबाराच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर  सहायक निरीक्षक विकास जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तोपर्यंत बघ्यांची गर्दी जमली होती.  वेताळ यांच्याकडे गोळीबाराबाबत चौकशी केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हल्लेखोर कोण होते? गोळीबार कशासाठी केला? याचा अद्याप उलगडा होऊ शकला नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास कर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: sangali
First Published: Feb 27, 2020 06:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading