Elec-widget

पुण्यात गोळीबार, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा मृत्यू

पुण्यात गोळीबार, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा मृत्यू

पुणे आणि परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक टोळ्यांचं प्रस्त वाढलंय. या गुन्हेगारी टोळ्या आणि त्यातली दादा माणसं ही उत्तर प्रदेश आणि बिहारमधून अवैध शस्त्र आणून त्याचा वापर करत असतात.

  • Share this:

वैभाव सोनावणे, पुणे 13 ऑगस्ट : पुण्यातल्या हडपसर भागात मंगळवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये भांडण झालं. त्यात एकाने दुसऱ्यावर गोळीबार केला. या भांडणात रस्त्यावरून जाणाऱ्या एका वॉचमनचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली घडलीय. भांडण करणारे हे दोघही गुन्हेगारी पार्श्वभूमीचेच होते अशी माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झालंय. पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध सुरू केला असून परिसराची नाकेबंदीही करण्यात आलीय.

गंगानगर हडपसर येथे मयूर गुंजाळ आणि तेजस कल्याणी यांच्यामध्ये वाद होता. गेल्या अनेक वर्षांपासून या दोघांमध्ये वाद होता. दोघही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होते. या दोघांचीही पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरुपाची होती. या धुमसणाऱ्या वादाचा आज स्फोट झाला. गुंजाळ दिसताच तेजस कल्याणीने त्याच्यावर गोळीबार केला.

VIDEO : सांगलीच्या महापुरात भिडे गुरुजींना आठवला लवासा, मदतीचं काय?

गुंजाळ याच्या दिशेने तेजसने गोळी झाडली मात्र त्याचा नेम चुकला आणि ती गोळी त्याच बाजूला फुटपाथवर चालणाऱ्या वॉचमनच्या पायाला लागली. घटनास्थवर असलेल्या लोकांनी त्यांना तत्काळ नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने उपचारादरम्यानच त्यांचं हॉस्पिटलमध्ये निधन झालं अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय.

पुरग्रस्तांसाठी सरसावले हजारो हात, 8 दिवसांमध्ये तिजोरीत जमा झाली 'एवढी' रक्कम

Loading...

पुणे आणि परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक टोळ्यांचं प्रस्त वाढलंय. या गुन्हेगारी टोळ्या आणि त्यातली दादा माणसं ही उत्तर प्रदेश आणि बिहारमधून अवैध शस्त्र आणून त्याचा वापर करत असतात. अशा टोळ्यांविरूद्ध पोलिसांनी अनेकदा धडक करवाई केली होती. मात्र त्याचा फारसा फायदा होत नाही.

जमीनीच्या वाढलेल्या किंमती आणि त्याला आलेला सोन्याचा भाव. औद्योगीक हितसंबंध, लुटमारीचा धंदा यातून अनेक टोळ्यांचे परस्पर हितसंबंध दुखवले जातात आणि त्यातून भांडणं होत असल्याची माहितीही पोलीस सूत्रांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pune
First Published: Aug 13, 2019 09:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...