पुण्यात आणखी एक सैराट..प्रेमविवाह केल्याने तरुणीचा भाऊ आणि चुलत्याने झाडल्या गोळ्या

पुण्यात आणखी एक सैराट..प्रेमविवाह केल्याने तरुणीचा भाऊ आणि चुलत्याने झाडल्या गोळ्या

उच्चजातीत प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणीचा भाऊ आणि चुलत्याने तरुणावर तब्बल पाच गोळ्या झाडल्या. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पुण्यातील चांदणी चौकात ही धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे (प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड, 9 मे- उच्चजातीत प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणीचा भाऊ आणि चुलत्याने तरुणावर तब्बल पाच गोळ्या झाडल्या. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पुण्यातील चांदणी चौकात ही धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्यातील चांदणी चौकात बुधवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास हा थरार घडला. या घटनेत तुषार पिसाळ (20) याला पोटात आणि छातीत 4 गोळ्या लागल्या आहेत त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुषारची प्रकृती स्थिर आहे.

काय आहे हे प्रकरण?

आरोपी राजू तावरे याची पुतणी आणि आकाश तावरे याची बहीण विद्याने तुषारशी प्रेमुविवाह केला होता. तुषार हा उच्च जातीतील आहे. विद्या आणि तुषारच्या विवाहाला तावरे कुटुंबाचा विरोध होता. या रागातून हा हल्ला करण्यात आला. तुषार बुधवारी संध्याकाळी त्याच्या मित्रांसह एका लग्नाला गेला होता. तेथून परत येताना तुषारची दुचाकी बंद पडली. ते सातच्या सुमारास चांदणी चौकात बंद पडलेल्या पेट्रोल पंपासमोर आले. विद्याचा चुलता राजू तावरे, भाऊ आकाश तावरे, सागर तावरे आणि त्यांचा मित्र सागर पालवे यांनी तुषारला घेरले. राजू तावरे याने तुषारवर पिस्तूल रोखून त्याच्यावर पाच गोळ्या झाडल्या. तुषारच्या पाठीत, पोटात आणि छातीमध्ये गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. राजू तावरे, आकाश तावरे, सागर तावरे, सागर पालवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिली आहे.

VIDEO:विदर्भात पुन्हा सुर्याचा प्रकोप, हवामान विभागाने दिला इशारा

First published: May 9, 2019, 4:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading