सेंट्रल बँकेत सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार.. तीन महिलांसह चौघे जखमी

सेंट्रल बँकेत सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार.. तीन महिलांसह चौघे जखमी

तालुक्यातील वरणगाव येथे सेंट्रल बँकेच्या शाखेत सुरक्षा रक्षकाकडून अनावधानाने बंदुकीची गोळी सुटून चार जण जखमी झाले आहेत.

  • Share this:

इम्तियाज अहमद, (प्रतिनिधी)

भुसावळ, 20 ऑगस्ट- तालुक्यातील वरणगाव येथे सेंट्रल बँकेच्या शाखेत सुरक्षा रक्षकाकडून अनावधानाने बंदुकीची गोळी सुटून चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेली माहिती अशी की, सुरक्षारक्षक लखीचंद चौधरी हे मंगळवारी बॅंकेत नेहमीप्रमाने ड्युटी बजावत होते. यावेळी बॅंकेत ग्राहकांची गर्दी होती. काही ग्राहक बाहेरील खुर्च्यांवर बसले होते. दरम्यान भिंतीला लटकविलेली बंदुक काढतताना लखीचंद चौधरी यांच्या हातून अनावधानाने बंदुकीचा ट्रीगर दाबला जाऊन बंदुकीतून गोळी सुटली. यामुळे बॅंकेत रांगेत बसलेले चार ग्राहकांना गोळी लागून ते जखमी झाले. प्रमिला वसंत लोहार, शोभा प्रकाश माळी, कलाबाई चौधरी आणि राधेशाम छबिलदास जैसवाल अशी जखमींची नावे आहेत. सगळ्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरक्षारक्षक लखीचंद चौधरी यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

व्यवहार ठप्प..

गोळीबाराच्या घटनेमुळे बॅंकेतील व्यवहार ठप्प झाले. घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वाऱ्यासारखी भरधाव कार आली आणि लोकांना चिरडलं, धक्कादायक CCTV

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2019 05:07 PM IST

ताज्या बातम्या