भंडारदऱ्यात काजवा महोत्सव, अंधारात पाहा लुकलुकणारे काजवे

भंडारदऱ्यात काजवा महोत्सव, अंधारात पाहा लुकलुकणारे काजवे

  • Share this:

उदय जाधव, मुंबई

आकाशातील चांदण्या जमिनीवर अवतरल्या तर कसं वाटेल, अगदी तसाच अनुभव भंडारदरा येथील काजवा फेस्टिव्हलला यतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी भंडारदर्यातील जंगलात, ही निसर्गाची रोषनाई दिसते. डोळे दिपवणारी ही रोषणाई खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.

किर्रर... अंधारात रातकिड्यांच्या आवाजात, ही निसर्गाची रोषनाई आहे भंडारदरा जंगलातील. पावसाळ्याच्या सुरूवातीचा काळ, हा काजव्यांचा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे एकाच वेळी हजारो नर-मादी काजवे एकमेकांना आकर्षित करण्यासाठी आपला नैसर्गिक जैवप्रकाश असा प्रकाशमान करतात.

भंडारदरा... कळसुबाई... घाटघर परीसरातील जंगलात हे काजवे मोठ्या संख्येने दिसतात. जंगलातील आंबा, उंबर, हीरडा, बेहडा, सादडा, जांभूळ अशा निवडक झाडांवरच काजवे चमकतांना दिसतात. त्यामुळे ही झाडे ख्रिसमस ट्री सारखे चमकू लागतात. त्यामुळेच आता एमटीडीसीनेही काजवा फेस्टीव्हल सुरू केलांय.

काजव्यांच्या शेपटीकडील अवयवात ल्युसिफेरीन नावाचं एक जैव रसायन असतं. याच रसायनाचा हवेतील आॅक्सीजनशी प्रक्रिया झाली की मग त्यातून प्रकाश बाहेर येतो. टिपूस प्रकाशाचा हा खेळ पाहील्यावर आपल्याला, तारे जमीन पर... आल्याचाच भास होतो.

First Published: Jun 10, 2017 04:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading