Home /News /maharashtra /

पेटलेला ट्रक मागे आला अन् रिक्षाला धडकला, दोघांचा होरपळून मृत्यू, घटनास्थळाचा LIVE VIDEO

पेटलेला ट्रक मागे आला अन् रिक्षाला धडकला, दोघांचा होरपळून मृत्यू, घटनास्थळाचा LIVE VIDEO

रिक्षामध्ये दोन प्रवासी होते. ट्रकची रिक्षाला धडक बसल्यामुळे एकच आगडोंब उसळला आणि रिक्षालाही सुद्धा आग लागली.

अंबरनाथ, 19 जानेवारी : अंबरनाथ (ambarnath) बदलापूर पाईपलाईन रोडवर (ambernath badlapur pipeline road) भीषण अपघात झाला आहे. केमिकलने भरलेल्या ट्रकने रिक्षाला धडक दिली. यामुळे ट्रकने पेट घेतला. या अपघातात 2 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ बदलापूर पाईपलाईन रोडवर आज दुपारी हा भीषण अपघात घडला. एक केमिकलने भरलेला ट्रक तळोजाच्या दिशेनं जात होता. पण, अचानक ट्रकने पेट घेतला. त्यामुळे चालकाने ट्रक सोडून उडी मारली. पण पेटलेला ट्रक तसाच मागे आला. त्याचवेळी मागे असलेल्या एका रिक्षाला धडकला. रिक्षामध्ये दोन प्रवासी होते. ट्रकची रिक्षाला धडक बसल्यामुळे एकच आगडोंब उसळला आणि रिक्षालाही सुद्धा आग लागली. यात रिक्षातील दोघांचा होरपळून मृत्यू झाला. वासुदेव भोईर आणि गुलाब बाई भोईर अशी मृतांची नाव आहे. या अपघातामुळे रस्त्यावर एकच वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. पण, या दुर्दैवी अपघातात दोन जणांचा हाकनाक बळी गेल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. टँकरमधून अ‍ॅसिड उडाले, 4 जण भाजले दरम्यान, सोमवारी धावत्या टँकरमधून अ‍ॅसिड उडून आजूबाजूचे नागरिकांवर पडल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली. या दुर्घटनेत 3 ते 4 जण गंभीर भाजले आहेत. उल्हासनगरच्या सेंच्युरी कंपनीतून सल्फ्युरिक अ‍ॅसिड घेऊन एक टँकर तळोजा एमआयडीसीत निघाला होता. हा टँकर श्रीराम चौकात आल्यानंतर टँकर चालकानं अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे टँकरमधलं सल्फ्युरिक अ‍ॅसिड उसळून टँकरच्या मागे असलेल्या दुचाकी चालकांच्या अंगावर उडालं. या घटनेत दुचाकी चालवत असलेले तीन ते चार जण जखमी झाले. यापैकी दिलीप पुरस्वानी आणि भारत वसीटा या दोघांच्या अंगावर सर्वात जास्त अ‍ॅसिड सांडल्यानं ते मोठ्या प्रमाणात भाजले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या