मुंबई, 30 मार्च : मुंबईत मंत्रालयात लागलेली आग आटोक्यात आली आहे. सात मजली असलेल्या या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अग्निशामक दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या. रात्री 8.45 च्या सुमारास ही आग लागली होती. त्यानंतर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Maharashtra: Fire breaks out on the 4th floor of Mantralaya Building in Mumbai. Fire tenders have been rushed to the spot. More details awaited.
मंत्रालयातील आग आटोक्यात आल्याची माहिती मिळाली आहे. चौथ्या मजल्यावरील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कार्यालयाशेजारी असेलेल्या कार्यालयाला आग लागली होती. याची माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी दिली.
याआधीही मंत्रालयाला आग लागली होती. 2012 च्या जून महिन्यात मंत्रालयाला भीषण आग लागली होती. आतापर्यंत मंत्रालयात लागलेली ही सर्वात मोठी आग होती. दरम्यान, गेल्या महिन्यात मुंबईतील माझगाव येथे असलेल्या जीएसटी भवनाला भीषण आग लागली होती. इमारतीच्या आठव्या मजल्यावर लागलेल्या आगीनंतर आठवडाभर जीएसटी भवन बंद होते.