नाशिक महापालिकेत शिवसेना नेत्याच्या दालनात अग्नितांडव, पहिला VIDEO

नाशिक महापालिकेत शिवसेना नेत्याच्या दालनात अग्नितांडव, पहिला VIDEO

बघता बघता काही क्षणात आगीने रौद्ररुपधारण केले. कार्यालयातील लाकडी फर्निचर आगीच्या भक्षस्थानी सापडले.

  • Share this:

नाशिक, 22 जानेवारी : नाशिक महानगर पालिकेच्या  (nashik-municipal-corporation) मुख्य इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे (Shivsena) विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांच्या दालनात आग लागली आहे. या घटनेमुळे महापालिकेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शरणपूर रोड नाशिक महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनात आज सकाळी नियमितपणे कामकाज सुरू झाले होते. मात्र, अचानक इमारतीच्या वरच्या मजलावर अचानक धूर येऊ लागला. शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांच्या दालनात आग लागल्याचे स्पष्ट झाले.

बघता बघता काही क्षणात आगीने रौद्ररुपधारण केले. कार्यालयातील लाकडी फर्निचर आगीच्या भक्षस्थानी सापडले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान पालिकेत दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आग लागली की लावली याची चौकशी करावी अशी मागणी शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे. तर पेस्ट कंट्रोल केल्या नंतर आग लागली असावी, असं भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी सांगितले आहे.

Published by: sachin Salve
First published: January 22, 2021, 1:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या