अमरावती, 3 जून- स्मशानभूमीतील जळत्या चितेची ठिणगी उडून शेतात भीषण आग लागून मोसंबीच्या कलमा जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. चांदूर रेल्वेवरून 14 किलोमीटर अंतरावरील शेंदुरजना (खुर्द) येथे ही घटना घडली आहे.
VIDEO : भाजप आमदाराकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
शेतकरी प्रभुराज अमृतराव इंगळे यांचे सर्वे नं. 30 मध्ये साडेपाच एकर शेत आहे. यापैकी 2 एकरात त्यांनी मोसंबीच्या कलमा लावल्या होत्या. सदर शेत हे गावालगतच्या हिंदु स्मशानभूमीला लागून आहे. अशातच रविवारी गावात एका व्यक्तीचे निधन झाले. सदर व्यक्तीच्या पार्थिवावर सायंकाळी 4 वाजता स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अशातच सायंकाळी 5 च्या सुमारास चितेची ठिणगी अचानक उडाल्याने स्मशानभूमी परिसरातील वाळलेले गवत जळाले. आग पसरत जाऊन प्रभुराज इंगळे यांच्या शेतात पोहोचली. इंगळे यांचे 25-30 मोसंबीच्या कलमा जळून खाक झाल्या. इंगळे यांनी या कलमा 3 वर्षांपूर्वी लावल्या होत्या. धुऱ्यावरील निंबु, करवंदाची झाडे सुद्धा जळून खाक झाली आहेत.
अभिनेत्री पायल रोहतगीचे पुन्हा एकदा वादग्रस्त ट्वीट..जितेंद्र आव्हाडांनी केला हा आरोप
या घटनेची माहिती मिळताच नागरीकांनी अथक प्रयत्नाने आग विझवली. या घटनेत प्रभुराज इंगळे यांचे 30 हजारांचे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. आधीच तालुक्यात दुष्काळस्थिती असताना शेतकरी संत्रा, मोसंबी बाग कशातरी जगवत आहे. याचमध्ये अशा प्रकरणाची भर पडल्यास शेतकरी अजून विवंचनेत सापडला आहे.
तिसरी मुलगी झाली, आईने 10 दिवसाच्या चिमुकलीची गळा दाबून केली हत्या
SPECIAL REPORT:नागाला वाचवण्यासाठी प्राणाची बाजी, विहिरीतील थरार कॅमेरात कैद