Home /News /maharashtra /

नाशिक ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये थोडक्यात टळली आगीची दुर्घटना, सापडले गॅसचे 4 रिकामे सिलेंडर

नाशिक ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये थोडक्यात टळली आगीची दुर्घटना, सापडले गॅसचे 4 रिकामे सिलेंडर

नाशिकमधील ब्रीच कँडी रुग्णालयाच्या तळमजल्याला आज दुपारच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली.

नाशिक, 14 जानेवारी : राज्यातभरात मकरसंक्रांतीचा उत्साह सुरू आहे. पण नाशिकमध्ये रुग्णालयाला आग लागण्याची घटना घडली आहे. नाशिकमधील (nashik) प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयाच्या ( Breach Candy Hospital Nashik ) तळमजल्यात आग लागली. पण सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्धा तासात नियंत्रणात आग आणली आहे. नाशिकमधील ब्रीच कँडी रुग्णालयाच्या तळमजल्याला आज दुपारच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. रुग्णालयातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडायला लागल्यामुळे एकच धावपळ उडाली होती. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. रुग्णांच्या नातेवाईकांची एकच धावपळ सुरू झाली होती. फोन कॉलवरून असा चोरी होऊ शकतो तुमचा OTP; Cyber Dost ने पुन्हा केलं अलर्ट घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी रुग्णालयाच्या परिसरात धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.  अजूनही तळघरात असलेल्या गाद्या बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. गाद्या बाहेर काढताना तळमजल्यात गॅसचे चार रिकामे सिलिंडर आढळून आल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले आहे. डॉक्टरांसह कमर्चाऱ्यांचे पगारासाठी निदर्शने दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नसून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज शेगावात सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स सह अशा सेविकांनी रुग्नालयासमोर निदर्शने केली. पुण्यात बिर्याणीवरून पुन्हा तुंबळ हाणामारी, टोळक्यानं लोखंडी सळईने केले वार बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट यासह अशा सेविकांचे मागील ऑक्टोबर महिन्यापासून चे वेतन शासनाने अदा केले नाही. सेंट्रल नोडल प्रणाली लागू करण्याचे काम सुरू असल्याचे सांगून सदर वेतन थांबविल्याने कर्मचार्‍यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या