Home /News /maharashtra /

गोदामाला भीषण आग, शेतकऱ्यांचं 12 कोटींचं नुकसान

गोदामाला भीषण आग, शेतकऱ्यांचं 12 कोटींचं नुकसान

जिल्ह्यातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला चालू वर्षातील बेदाणा या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला होता.

    सांगली, 11 नोव्हेंबर : तासगाव तालुक्यात कोल्ड स्टोरेजला लागलेल्या आगीत तब्बल 12 कोटींचा बेदाणा जळून खाक झाला आहे. कवठेएकंद येथील सिद्धनाथ कोल्ड स्टोरेजमध्ये ही आग लागली आहे. नामदेव ठिगळे यांच्या मालकीचं हे कोल्ड स्टोरेज असून जिल्ह्यातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला चालू वर्षातील बेदाणा या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला होता. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. बेदाण्याच्या कोल्ड स्टोरेजला लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केलं. यात तब्बल 172 टन बेदाणे म्हणजेच 1 लाख 15 हजार बेदाण्याचे बॉक्स जळून खाक झाले आहेत. आगीत कोल्ड स्टोरेजची इमारतही पूर्णपणे जळाली आहे. अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात येत होते. पण आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत होतं. या दुर्घटनेत जिल्हातील शेतकऱ्यांचं तब्बल 12 कोटी रूपयांचं नुकसान झालं असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आधीच दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. आता सरकारकडून यासंदर्भात शेतकऱ्यांना काही भरपाई मिळणार का, हे पाहावं लागेल. VIDEO: दगड डोक्यात घालून दोन जणांना केली जबर मारहाण
    First published:

    Tags: Cold storage, Farmer, Fire, Sangali

    पुढील बातम्या