Elec-widget

लंडन नव्हे मावळ, केसांना आग लावून केली जातेय कटिंग!

लंडन नव्हे मावळ, केसांना आग लावून केली जातेय कटिंग!

परदेशात तसंच शहरात कमी वेळेत मोठ्या प्रसिद्धीझोतात आलेला फायर कटिंगचा ट्रेन्ड आता ग्रामीण भागातही रुजू लागला आहे.

  • Share this:

अनिस शेख, प्रतिनिधी

लोणावळा, 22 नोव्हेंबर : कोण कधी आणि कशाचा शोध लावेल सांगता येत नाही. हल्ली सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यातच लंडनमधील एका सलूनमध्ये 'फायर हेअर कट' केल्याचा व्हिडिओ पहिल्यांदा इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आता मावळ सारख्या ग्रामीण भागातही फायर हेअर कटची क्रेझ पोहोचली आहे.

परदेशात तसंच शहरात कमी वेळेत मोठ्या प्रसिद्धीझोतात आलेला फायर कटिंगचा ट्रेन्ड आता ग्रामीण भागातही रुजू लागला आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव या छोट्याशा गावातील 'जी स्पिरिट' या सलूनमध्ये फार हेअर कटिंग करण्यासाठी सध्या तरुणांची रीघ लागली आहे. जवळपास पाच पिढ्यांपासून सलून व्यवसाय करणाऱ्या शिंदे कुटुंबातील पाचव्या पिढीतल्या गौरव शिंदे या 22 वर्षीय तरुणाने काळानुरूप हेअर स्टाईलमध्ये बदल करत अनोख्या फायर हेअर कटिंगच्या माध्यमातून संपूर्ण मावळ तालुक्यात प्रसिद्धी मिळवली आहे.

सोशल मीडियावर गौरव याचे व्हिडिओ मोठ्याप्रमाणावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ग्राहक शोधत का होईना, तळेगाव येथील त्याच्या जी स्पिरिट या सलूनमध्ये फायर हेअर कटिंगचा अनुभव घेण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.

फायर कट सध्या मोठा आकर्षणाचा ट्रेंड होत आहे. डोक्यावरचे केस पाहिजेत अशा आकारात सेट करता येत असल्याने फायर कटिंगची तरुणांमध्ये क्रेझ वाढली आहे.

Loading...

अशी केली जाते फायर हेअर कट

अनोख्या प्रकारचे जेल लिक्विड केसांवरती लावून केसांना आग लावली जाते आणि त्यानंतर दोन कंगव्याच्या साहाय्याने केसांना पाहिजे तसा सुंदर लूक देता येतो. परंतु, हे सर्व करत असताना विशिष्ट खबरदारी घेण्याची गरज असल्याचं गौरव शिंदे यांनी सांगितलं. तसंच घरी अशा प्रकारचे फायर हेअर कटिंग न करण्याचा सल्लाही गौरवने दिला.

पारंपरिक व्यवसायाच्या माध्यमातून सोशल मीडियाचा आधार घेत संपूर्ण तालुक्यात फायर हेअर कटिंग च्या माध्यमातून गौरव शिंदेने आपली नवीन ओळख निर्माण केली आहे.

=======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2019 06:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...