घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. नांदेडमधील मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद गावात मध्यरात्री ही दुर्दैवी घटना घडली. लाकडी बांबू आणि पत्र्यापासून तयार केलेलं हे घर होतं. यामध्ये व्यंकट पवार ( 39 वर्षे ), रेखा पवार ( 32 वर्षे ), काजल पवार ( 8 वर्षे ) यांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 वर्षाचा किरण या आगीतून बचावला आहे. पण, आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.