Home /News /maharashtra /

ऐन सणासुदीला केमिकल कंपनीमध्ये भीषण अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा पाहा VIDEO

ऐन सणासुदीला केमिकल कंपनीमध्ये भीषण अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा पाहा VIDEO

आग इतकी भीषण होती की रात्रीत संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. सुरूवातीला झालेल्या आवाजाने परिसरात हादरा बसल्याने स्फोट झाल्याची भीती व्यक्त केली जात होती.

रोहा, 12 नोव्हेंबर : ऐन सणासुदीच्या दिवसाआधी केमिकल कंपनीत आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्‍यात असलेल्या धाटाव एमआयडीसीमधील सुदर्शन केमिकल लिमिटेड या कंपनीच्या डी. सी एल. स्टोअरेज प्लॅन्टला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. ही आग काही क्षणात एवढी भयंकर भडकली की त्याचे उंच लोट दूरपर्यंत पसरलेले दिसत होते. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात स्थानिकांनी कैद केली आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मध्यरात्री लागलेल्या या आगीत पाहता पाहता कंपनीचा बराच भाग आगीच्या भक्ष्यस्थानी आला होता. आगीचे किटाळ लांबपर्यंत उडत होते. तर परिसरात धुराचे लोट आणि आगाच्या ज्वाळा रौद्र रुप धारण करून होता. या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या व्हिडीओमध्ये आगीची भीषणता आपण पाहू शकता. हे वाचा-राज्यात जानेवारी-फेब्रुवारीत COVID-19च्या दुसऱ्या लाटेची शक्यता आग इतकी भीषण होती की रात्रीत संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. सुरूवातीला झालेल्या आवाजाने परिसरात हादरा बसल्याने स्फोट झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. रात्री पावणे बाराच्या सुमारास आग लागल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन आणि रोहा नगरपालिका तसेच एमआयडीसी अग्निशमन दलाच्या दोन तुकड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्यावर सुमारे तासाभरात आगीवर पूर्ण पणे नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
Published by:Kranti Kanetkar
First published:

Tags: Fire, Raigad

पुढील बातम्या