Home /News /maharashtra /

खासगी बसनं अचानक घेतला पेट, चालकाच्या प्रसंगावधानानं वाचला जीव, पाहा VIDEO

खासगी बसनं अचानक घेतला पेट, चालकाच्या प्रसंगावधानानं वाचला जीव, पाहा VIDEO

प्रवाशांना पटापट खाली उतरवून चालक पुढे जाणार एवढ्यात बसने पेट घेतला आणि आगीनं रौद्र रुप धारण केलं.

    औरंगाबाद, 16 नोव्हेंबर : औरंगाबादहून अहमदाबादकडे जाणाऱ्या लक्झरी बसला भीषण आग लागली आहे. सोमवार पहाटे सकाळी 3.30 वाजण्याच्या सुमारास धुळे-सुरत महामार्गावरील विसरवाडी पासून ८ किलोमीटर अंतरावर सोनखांब गावाजवळील शिवार शेरेटन हॉटेल लगत लक्झरी बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ घडला नाही. प्रवाशांचे प्राण वाचले आणि प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. एम के ट्रॅव्हल्सची बस क्रमांक MH40 AT2929 औरंगाबादहून अहमदाबादकडे निघाली होती. बस पहाटे नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाट उतरून सोनखांब शिवारातून जात असता लक्झरी बसच्या लायनरच्या घर्षणामुळे चाकाने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे समजताच चालकाने तत्काळ रस्त्याच्या कडेला बस थांबवली आणि सर्वात पहिल्यांदा प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. हे वाचा-6 कोटी लोकांना लवकरच मिळणार डोस, पुण्याच्या सीरमनं तयार केली लस प्रवाशांना पटापट खाली उतरवून चालक पुढे जाणार एवढ्यात बसने पेट घेतला आणि आगीनं रौद्र रुप धारण केलं. आगीचं रौद्र रुप धारण केल्याचं पाहून प्रवाशांच्या मनात देखील काही वेळ भीती निर्माण झाली आहे. आगीची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला देखील देण्यात आली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
    First published:

    Tags: Aurangabad

    पुढील बातम्या