VIDEO : नागपुरातील दुकानात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी

VIDEO : नागपुरातील दुकानात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी

अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

  • Share this:

नागपूर, 15 नोव्हेंबर : ऐन सणासुदीच्या काळात मोठी दुर्घटना समोर आली आहे. नागपुरातील सी. ए. रोडवर दुकानाला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीमुळे धुराचे उंच लोट आकाशात दिसत आहे. रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास साधारण ही आग लागल्याचा अंदाज आहे. काही क्षणात संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी होतं.

मिळालेल्या माहितीनुसार जे बी लायटिंग या दुकानामध्ये ही भीषण आग लागली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीनं धुराचे लोट बाहेर येत आहेत. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

हे वाचा-राजधानी दिल्लीत प्रदूषणाची स्थिती गंभीर, बंदी असूनही फोडण्यात आले फटाके

अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानातील साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झालं आहे. नागपुरात लागलेल्या या आगीमुळे खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून सध्या कुलिंग ऑपरेशनचं काम सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 15, 2020, 8:33 AM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या