अकोल्यात बँकेत अग्नीतांडव, 8 ते 10 लाख रुपये जळून खाक

अकोल्यात बँकेत अग्नीतांडव, 8 ते 10 लाख रुपये जळून खाक

विदर्भ ग्रामीण बँकतील कॉम्प्युटरला अचानक आग लागली, ही आग इतकी भयंकर होती संपूर्ण बँकेत ही आग पसरली.

  • Share this:

 अकोला, 11 जुलै: अकोल्यातील विदर्भ ग्रामीण बँकेत भीषण आग लागली. या आगीत 8 ते 10 लाख रूपये जळून खाक झाल्याची माहिती मिळतेय. सुदैवाने या दुर्घटनेत जीवीतहानी झाली नाही मात्र बँकेचं मोठं नुकसान झालंय. आज दुपारी चार वाजताच्या दरम्यान अकोल्यातील मलकापूर येथील विदर्भ ग्रामीण बँकतील  कॉम्प्युटरला अचानक आग लागली, ही आग इतकी भयंकर होती संपूर्ण बँकेत ही आग पसरली.

या आगीमध्ये अंदाजे 8 ते 10 लाख रुपये रोख जळल्याची माहिती बँकेच्या व्यवस्थपकांनी दिली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे पर्यंत सुरू आहेत. आग आटोक्यात आली असून, बँकेत आणखी काय नुकसान झाले आहे  हे पहिल्या जात आहे.

First published: July 11, 2018, 6:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading