'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेवरून अग्निशमन दलाचे कर्मचारी भिडले

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेवरून अग्निशमन दलाचे कर्मचारी भिडले

या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात किशोर भोरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

गणेश गायकवाड, प्रतिनिधी

अंबरनाथ, 25 आॅक्टोबर : 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका पाहण्यावरून  अंबरनाथ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत एक कर्मचारी जखमी झाला असून अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी संध्याकाळच्या सुमारास अग्नीशमन दलाचे जवान प्रकाश कराड हे माझ्या नवऱ्याची बायको  मालिका पाहत होते. मात्र  किशोर याने चॅनल बदलून भारत आणि वेस्ट इंडिज ही क्रिकेट मॅच लावली.

दरम्यान, प्रकाश याने पुन्हा मालिका लावण्यास सांगितले त्याला किशोरने नकार दिला. यावरून दोन्ही कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.

त्यावेळी किशोर  भोर याने प्रकाशला लोखंडी रॉडने मारहाण करून त्याला जखमी केले.

या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात किशोर भोरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पालिकेच्या मुख्याधिकारी देविदास पवार यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

दरम्यान,दर आठवड्याप्रमाणे टीआरपी रेटिंग सगळ्यांच्या समोर आलंय. पुन्हा एकदा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेनं आपलं स्थान अबाधित ठेवलंय. गेले अनेक आठवडे ही मालिका नंबर वनवरच आहे. आता तर शनाया आणि राधिका एकत्र आल्यात. दोघी मिळून गुरूला धडा शिकवतायत. शनाया गुरूकडून सगळी गुपितं काढून घेतेय.

=====================================================================

First published: October 25, 2018, 7:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading