मित्राला भेटायला आला आणि मुलगा लिफ्टमधे अडकला, अशी झाली सुटका

मित्राला भेटायला आला आणि मुलगा लिफ्टमधे अडकला, अशी झाली सुटका

जवानांनी साहिलला आवाज देऊन तो व्यवस्थित असल्याची खात्री केली. लगेच पाचव्या मजल्यावर जवानांनी धाव घेऊन मोठ्या दोरीच्या साह्याने लिफ्टला बांधून स्थिर करत जास्त धोका होणार नाही याची काळजी घेतली.

  • Share this:

पुणे 16 जुलै : पुण्यात लिप्टमध्ये अडकलेल्या 11वर्षीय मुलाला अग्निशमन दलानं सहिसलामत बाहेर काढलंय. हा चिमुरडा आपल्या मित्राला भेटायला गेला होता. तेव्हाच नेमकी सोसायटीची लिफ्ट बंद पडली. सोसायटीतल्या लोकांनी हा प्रकार फायर ब्रिगेडला कळवताच त्याला अर्ध्या तासातच रेस्क्यू केलं, येवलेवाडीतील श्री सृष्टी सोसायटी सोसायटीत या चिमरड्यावर हा बाका प्रसंग ओढवला होता.

सायंकाळी पाच वाजता साहिल पोटफोडे हा अकरा वर्षांचा मुलगा  आपल्या मित्राला भेटण्यासाठी येवलेवाडीतल्या श्री सृष्टी सोसायटी या अकरा मजली इमारतीत आला. लिफ्टच्या साह्याने वरच्या मजल्यावर जात असताना लिफ्टची गिअर वायर अचानक तुटली. त्यामुळे साहिल हा चौथ्या मजल्यावर अडकला. सोसायटीतल्या लोकांनी याची माहिती अग्निशमन दलाला देताच कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले.

चांगले रस्ते हवे असतील तर आयुष्यभर टोल द्या, नितीन गडकरींचं वक्तव्य

श्री सृष्टी सोसायटी येथे पोहचल्यावर जवानांनी साहिलला आवाज देऊन तो व्यवस्थित असल्याची खात्री केली. लगेच पाचव्या मजल्यावर जवानांनी धाव घेऊन मोठ्या दोरीच्या साह्याने लिफ्टला बांधून स्थिर करत जास्त धोका होणार नाही याची काळजी घेतली.  नंतर दलाकडिल हायड्रोलिक बोल्ड कटर, सर्क्युलर सॉ व टुल किट वापरुन लिफ्टची जाळी व पत्रा कापून साहिलची सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर सुखरुप सुटका केली.

कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राचे वाहन चालक शरद गोडसे, जवान अजित बेलोसे, निलेश लोणकर, मंगेश टकले, रवि बारटक्के यांनी तातडीने कारवाई करत साहिलची सुटका केल्याने मोठी दुर्घटना टळली.

नाशिकमध्ये 14 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू, आईची भूमिका संशयास्पद

शिक्षिकेची मुलीला बेदम मारहाण

वरोऱ्यातल्या सेंट अनिस पब्लिक स्कुल मधील नर्सरीच्या एल के जी वर्गात शिकणाऱ्या  एका चार वर्षाच्या विद्यार्थिनीला शिक्षिकेने बेदम मारहाण करण्याची घटना घडलीय. गृहपाठ केला नसल्याने शिक्षिकेने चिडून जाऊन त्या मुलीला अमानुषपणे मारहाण केल्याचं स्पष्ट झालंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आलाय. ही अघोरी शिक्षा करणाऱ्या शिक्षिकेला निलंबित करा अशी मागणी करण्यात येतोय.

अजिंठा लेणी परिसरात दारु आणि हुक्का पार्ट्या, नशेखोरांचा हैदोस

वरोरा शहराजवळ बोर्डा ग्रामपंचायत हद्दीतल्या द्वारका नगरी वसाहतीतील सेंट अनिस पब्लिक स्कुल आहे. सोमवार 15 जुलै रोजी सकाळी नेहमीप्रमाणे नर्सरीची मुलं शाळेत शिकत असताना  शिक्षिका वृषाली गोंडे हिने LKG B  वर्गात इंग्लिशमध्ये  अल्फाबेट पद्धत शिकवीत असताना दोन मुले बरोबर करत नसल्याने लक्षात येताच त्यांच्याकडुन अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न शिक्षिकेने केला. परंतु वर्गामध्ये त्या मुलीला अनेक वेळा सांगून सुद्धा लक्षात येत नव्हते त्यामुळे शेवटी शिक्षिकेला राग अनावर झाला  व बाजूला ठेवून असलेल्या छडीने त्या मुलीच्या पाठीवर  सपासप मारण्यास सुरुवात केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 09:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading