मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

काळ आला होता पण वेळ नाही, अमरावतीत बालकांच्या ICU कक्षाला आग, भंडारा दुर्घटनेची पुनरावृत्ती...

काळ आला होता पण वेळ नाही, अमरावतीत बालकांच्या ICU कक्षाला आग, भंडारा दुर्घटनेची पुनरावृत्ती...

अमरावतीच्या रुग्णालयात आयसी कक्षात आग लागली होती. सुदैवाने या दुर्घटनेत बालकांचा जीव बचावला आहे.

अमरावतीच्या रुग्णालयात आयसी कक्षात आग लागली होती. सुदैवाने या दुर्घटनेत बालकांचा जीव बचावला आहे.

भंडारा येथे 9 जानेवारी 2021 रोजी शासकीय रुग्णालयातील लहान बालकांच्या ICU कक्षात आग लागली होती. यात 10 बालकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्याच घटनेची पुनरावृत्ती आज अमरावती येथील शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयात घडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India

भंडारा, 25 सप्टेंबर : भंडारा येथे 9 जानेवारी 2021 रोजी शासकीय रुग्णालयातील लहान बालकांच्या ICU कक्षात आग लागली होती. यात 10 बालकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्याच घटनेची पुनरावृत्ती आज अमरावती येथील शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयात घडली. मात्र सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात सकाळी नऊ वाजता ही आग लागली. या ठिकाणी 37 बालक होते. आग लागताच तातडीने ही आग नियंत्रणात आणली गेली. 12 बालके इतर रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, अशी माहिती जिल्हाशल्य चिकित्सक यांनी दिलीय.

"मी आतमध्ये जाऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली", अशी माहीती अमरावतीचे अग्निशामक दल प्रमुख शेख अनवर यांनी दिली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अमरावती दौऱ्यावर आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालयात आयसीयू कक्षात आग लागली. या दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पटोले यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानले. राज्यात गेल्यावर्षी भंडारा येथे 10 बालकांचा मृत्यू झाला. तरी शासन याबाबत गंभीर नसल्याची टीका नाना पटोले यांनी केली. शासन आणि प्रशासनात समन्वयक नाही, असं ते म्हणाले.

('माझ्या तर नाकीनऊ आले आता फडणवीसांकडे 6 जिल्हे', अजितदादांची कोपरखळी)

अमरावती शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानंतर माजी मंत्री आणि भाजप आमदार प्रवीण पोटे यांनीदेखील रुग्णालयात जाऊन या ठिकाणी पाहणी केली. या संदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार, आगीच्या घटना कोणाला सांगून येत नाही, अशी प्रतिक्रिया प्रवीण पोटे यांनी दिली.

दरम्यान, अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. या घटनेची सखोल चौकशी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

First published:

Tags: Fire