मुंबईत मालाडमध्ये प्लायवुड गोडाऊनला लागली भीषण आग, पाहा VIDEO

मुंबईत मालाडमध्ये प्लायवुड गोडाऊनला लागली भीषण आग, पाहा VIDEO

आग विझवण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

  • Share this:

मुंबई, 6 नोव्हेंबर: मुंबईत मलाड पूर्वेत पठाणवाडी परिसरात अंबिका हॉटेलच्या समोर एका प्लायवुड गोडाऊनमध्ये भीषण आग लागली आहे.

आगीची माहिती मिळताच मुंबई पोलिस कर्मचारी आणि आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्लायवूडचं गोडाऊन असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे.

हेही वाचा...आता करा मज्जा! दिवाळीच्या सुट्टीत झाली मोठी वाढ, असं आहे नवं वेळापत्रक

या भीषण आगीचा व्हिडिओसमोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काल देखील मालाडमधील परमार हाऊस इंडस्ट्रियल एस्टेटमध्ये एका गोडाऊनला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 7 गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली होती.

दरम्यान, मुंबईत आग लागण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. यापूर्वी मुंबईच्या सायन परिसरात एका गोडाऊनला 28 ऑक्टोबरला पहाटे एक वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवानं या अग्निकांडात कोणालाही दुखापत झाली नाही.

हेही वाचा...माझे डोळे परत द्या...मी त्या नराधमांना ओळखेन, पुण्यातील पीडितेची आर्त विनंती

अंधेरीत लागली आग...

अंधेरीत एका 22 मजली इमारतीला 14 ऑक्टोबर रोजी आग लागली होती. 11 व्या मजल्यावर अडकलेल्या तीन नागरिकांना सुरक्षारक्षकांनी सुखरुप बाहेर काढलं होतं. तर 13 ऑक्टोबरला मुंबईत चर्णी रोड येथील ड्रीमलॅंड सिनेमाजवळ एका घरात आग भडकली होती. या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर आगीत अडकलेल्या 8 नागरिकांना वाचवण्यात आलं होतं. गंभीर जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं

Published by: Sandip Parolekar
First published: November 6, 2020, 7:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading