शोभेच्या दारुकामामुळे सोलापूरच्या यात्रेत भीषण स्फोट; २५ जण जखमी

शोभेच्या दारुकामामुळे सोलापूरच्या यात्रेत भीषण स्फोट; २५ जण जखमी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावात मळसिद्ध महाराजांच्या यात्रेवेळी गंभीर घटना घटली आहे. या यात्रेत शोभेच्या दारुकामामुळे भीषण स्फोट झाला आहे.

  • Share this:

16 जानेवारी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावात मळसिद्ध महाराजांच्या यात्रेवेळी गंभीर घटना घटली आहे. या यात्रेत शोभेच्या दारुकामामुळे भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात तब्बल २५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एका महिलेला आपला एक डोळा गमवावा लागला आहे. या स्फोटाची तीव्रता जास्त असल्यामुळे यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेप्रमाणे मंद्रूप गावात मळसिध्द महाराजांची यात्रा भरते. या यात्रेत गावातील आणि आजूबाजूच्या गावातील सगळे मडंळी फिरण्यासाठी आणि यात्रा पाहण्यासाठी येत असतात. या यात्रेत नंदीध्वज मिरवणुकीप्रमाणे शोभेचे दारुकामही होते. त्याच शोभेच्या दारुकामावेळी एक गोळा वरती जाऊन न फुटता तो पुन्हा खाली आणि दारुकामाच्या ठिकाणी पडून जोरात फुटला. त्यामुळे भीषण स्फोट झाला.

सोलापूरच्या यात्रेतील स्फोटात २५ जखमी असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांकडून जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आणि त्यांवर सध्या उपचार सुरू आहेत.

First published: January 16, 2018, 11:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading