मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /धक्कादायक! भंडाऱ्यात अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग, 10 बालकांचा मृत्यू

धक्कादायक! भंडाऱ्यात अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग, 10 बालकांचा मृत्यू

अग्निशमन दलाला त्वरित घटनेची माहिती देण्यात आली आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामध्ये गुदमरून बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

भंडारा, 9 जानेवारी : भंडाऱ्यात शनिवारी मध्यरात्री जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागून तब्बल 10 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अग्निशमन दलाला त्वरित घटनेची माहिती देण्यात आली आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामध्ये गुदमरून बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

आऊटबाँड युनिटमध्ये आग लागली होती. आऊटबाँड अर्थात बाहेरच्या रुग्णालयातून उपचारासाठी आलेल्या बाळांना या युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. मध्यरात्री 2 च्या सुमारास एका नर्सला नवजात शिशु केअर युनिटमधून धूर निघत असल्याचं लक्षात आलं. दरवाजा उघडल्यानंतर या यूनिटमध्ये मोठ्या प्रमाणात धूर झाल्याचं दिसलं. त्यानंतर त्वरित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली.

या यूनिटमधील 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र दुर्देवाने 10 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्याची माहिती मिळत आहे.

ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत गुदमरून मृत्यू झालेल्या बालकांचं पोस्ट मार्टेम करणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसंच घटनेमागचं कारण शोधून घटनेतील दोषींवर कारवाई करणार असल्याचं आरोग्य राज्यमंत्री येड्रावर यांनी सांगितलं आहे.

First published:

Tags: Fire